‘ हद्दवाढ रद्द झालीच पाहिजे.. ‘ : हद्दवाढविरोधात बालिंगा येथे कडकडीत बंद
करवीर :
कोल्हापूर हद्दवाढीच्या विरोधात संबंधित १८ गावांचा विरोध आहे. यां गावातून याला विरोध केला जात आहे. त्या अनुषंगाने करवीर तालुक्यातील बालिंगा येथे कडकडीत बंद पाळून हद्दवाढीला विरोध करण्यात आला. यावेळी ‘ हद्दवाढ रद्द झालीच पाहिजे ‘ अशा घोषणा देण्यात आल्या .
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे म्हणाले, संबंधित गावाना हद्दवाढीच्या संदर्भात विश्वासात नाही घेतले तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला.
यावेळी सरपंच पूजा विजय जांभळे, उपसरपंच पंकज कांबळे, अनिल पोवार, श्रीकांत भवड, अमर जत्राटे, जनार्धन जांभळे, एम एम भवड, मयूर जांभळे,
, अजय भवड़, पांडुरंग वाडकर, नंदकुमार
जांभळे, धनजय ढेंगे, युवराज जत्राटे, सचिन माळी, विश्वास जांभळे, काशीनाथ माने, अजय वाडकर, कृष्णात माळी, संभाजी जांभळे, मारुती जांभळे, आनंदा जांभळे, रघुनाथ कांबळे, संदीप सुतार आदी उपस्थित होते.