गोकुळच्या गाय खरेदी दर कपातीविरोधातील
आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार
करवीर :
करवीर तालुक्यातील कसबा बीड – बिडशेड येथील माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या यांच्या गॅरेज येथे आज बुधवारी (दि.११) सायंकाळी पाच वाजता होणार असल्याची माहिती बैठकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाने मागील ३ महिन्यात गाय दूध खरेदी दरात दोन वेळा कपात केली. म्हणजे एकूण ४ रुपये दर कपात केलेली आहे. या विरोधात आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी दूध उत्पादक सभासदांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली.
यां बैठकीच्या अनुषंगाने आज मंगळवारी पूर्व मिटिंग घेण्यात आली. यां मिटिंगमध्ये बुधवारी होणाऱ्या बैठकीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी यां व्यापक बैठकिला दूध उत्पादकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या मिटिंगला माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, बाबुराव हिलगे, कृष्णात हळदकर, मारुती चव्हाण, सुभाष दिंडे, चंद्रकांत चौगले, अजित बचाटे, संभाजी बचाटे, कृष्णात बचाटे, कुंडलीक कारंडे, बळीराम पाटील, , पांडुरंग चौगले, शिवाजी पाटील, सज्जन पाटील, अरुण चौगले, विश्वास पाटील, उत्तम जाधव, अरुण चौगुले शिवाजी गुरव, रंगराव पाटील, अजित पाटील अर्जुन चौगले आदी उपस्थित होते.