शिरोली दुमाला येथील पै.कै.सचिन पाटील कुस्ती संकुलाच्या दोन मल्लांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
शिरोली दुमाला : पुढारी वृत्तसेवा
करवीर तालुक्यातील तुळशी खोऱ्यातील शिरोली दुमाला येथील पै.कै.सचिन पाटील कुस्ती संकुलाचे रुद्र रामचंद्र कुंभार याने ३८ किलो वजनी गटात व महिला मल्ल कस्तुरी सागर कदम हिने ४० किलो वजनी गटात राज्यस्तरीय शालेय क्रीडा कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला. या घवघवीत यशामुळे या दोन्ही मल्लांची मध्य प्रदेश येथे दि. ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन्ही मल्ल बा. पुं.पाटील माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता ८ वी व ९ वीचे विद्यार्थी आहेत. त्यांना तुळशी सहकार समूहाचे युवा नेते, माजी उपसरपंच सरदार पाटील यांचे सहकार्य व कुस्ती संकुलाचे प्रशिक्षक पै. नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.