श्री कुंडलिक महादेव पाटील बहुउद्देशीय संस्थेमार्फत वि.मं.वाकरे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,वह्या,ग्रंथालयासाठी पुस्तके वाटप
करवीर :
करवीर तालुक्यातील वाकरे पंचक्रोशीत सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या श्री.कुंडलिक महादेव पाटील बहुउद्देशीय संस्थेमार्फत विद्या मंदिर वाकरे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वह्या, ग्रंथालयासाठी पुस्तके यांचे वाटप करण्यात आले.
सेवाही निरपेक्ष असते. निरलस असते. ती घड्याळ लावून करावयाची गोष्ट नसते. सेवेत वात्सल्य असते.पावित्र्य असते. ती श्रमाच्या रूपाने केलेली ईश्वराची पूजाच असते. या भावनेने श्री कुंडलिक महादेव पाटील बहुउद्देशीय संस्था वाकरे यांच्या माध्यमातून आतापर्यंत २६ जानेवारी- विद्यार्थी दत्तक योजना,गावातील पहिले डॉक्टर -शिक्षक -पोलीस इंजिनियर इत्यादी ४० लोकांचा सत्कार समारंभ, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थी सत्कार ,तज्ञांची व्याख्याने, श्रमदान, शाळेसाठी पाण्याची टाकी आदी सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
साहित्य वाटप कार्यक्रमप्रसंगी प्रथम शाळेच्या वतीने एस. बी. पाटील यांच्या हस्ते उपस्थित संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ पाटील तसेच सर्व सदस्य यांचे बुके देऊन स्वागत करण्यात आले. संस्थेच्या वतीने नूतन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शहाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.करवीर पोलीस ठाणे अंतर्गत निबंधलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेती श्रावणी नारायण सातपुते, तृतीय क्रमांक विजेती तन्वी सुनील पाटील या विद्यार्थिनींचा सत्कार संस्थेच्या मार्फत करण्यात आला.
शाळेच्या ज्येष्ठ अध्यापिका मीना गारे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष श्री.आदिनाथ पाटील यांनी संस्थेने गेल्या अनेक वर्षांमध्ये राबवलेल्या लोककल्याणकारी कार्याचा परिचय करून दिला. याप्रसंगी श्री कुंडलिक महादेव पाटील बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संदीप पाटील अशोक येरुडकर,. गणेश दिवसे,विजय कांबळे,पवन पाटील, सागर पोवार,ऋतुराज पाटील, उत्तम पोवार व मुख्याध्यापिका मेघा तारे, सर्व शिक्षक उपस्थित होते.
एस. एस. पाटील यांनी आभार मानले.