महे येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : ८१ रक्तदात्यांचा सहभाग, बुद्धीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
करवीर :
करवीर तालुक्यातील महे येथील श्री हनुमान दूध संस्थेचे चेअरमन, श्री भैरवनाथ विकास संस्थेचे संचालक व आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांचे समर्थक बुद्धीराज पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून गेली सहा वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. यावेळीही रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात ८१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
सुरुवातीस माजी उपसरपंच निवास पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उदघाट्न करण्यात आले. अर्पण ब्लड बँकचे एमडी राजेंद्र चिंचणीकर याच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर बाजीराव जरग,पांडू आबा, विश्वजीत पाटील कसबा बीड, संतोष साळव ,रोहन पाटील कोगे,सरदार माने,कृष्णात दिगवडे, विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त बुद्धीराज पाटील यांना महे गावचे सरपंच सज्जन पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य , भैरवनाथ विकास सेवा संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक तसेच श्री कृष्ण पाणीपुरवठा संस्था चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक यांच्या वतीने श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पाटील यांना दिवसभरात राजकीय, सामाजिक, विविध क्षेत्रातील नेते, मान्यवरांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाच्या निमित्त आयोजित रक्तदान शिबीर कार्यक्रमास कृष्णा ठाणेकर, संभाजी पाटील काका,तंटामुक्त अध्यक्ष सर्जेराव नवाळे,माजी उपसरपंच सचिन पाटील, एस.डी.जरग सर, शामराव तिबिले, निवास पाटील, सरदार कांबळे, माजी सरपंच नामदेव कांबळे ,बाळू कुंभार, सिद्धू लांडगे, प्रवीण नवाळे कॉन्टॅक्टर, संदीप पाटील वाकरे, महेश खाडे सांगरूळ यांच्यासह ग्रामस्थ, तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.