मराठा आरक्षण : पाडळी खुर्द येथे कडकडीत बंद
करवीर :
पाडळी खुर्द (ता. करवीर) जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मराठा आरक्षणला पाठिंबा देण्यासाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण गाव बंद करून एकमुखी पाठिंबा देण्यात आला.
ग्रामपंचायत पाडळी खुर्द यांच्या वतीने गाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. प्रथमत: ग्रामपंचायत सदस्य शिवराज पाटील यांनी सर्वांचे प्रास्ताविक केले.नरसिंह सहकार समूहाचे अध्यक्ष जी. डी. पाटील, अशोक पालकर, माधुरी पाटील, अमित कांबळे, चंद्रकांत सूर्यवंशी, सागर तानुगडे व मान्यवरांनी जालना जिल्ह्यातील सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेले मनोज जरांडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला व दडपशाही मार्गाने आंदोलन मोडण्याच्या प्रयत्नाचा जाहीर निषेध केला.
ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलन प्रसंगी सरपंच तानाजी पालकर, उपसरपंच मंगल पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सिताराम पाटील, नरसिंह समूहाचे अध्यक्ष जी. डी.पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, सुरज सुतार, संदीप कांबळे,सुवर्णा पाटील,कांचन पाटील,मंगल पाटील,सई सोहनी, नीलम कांबळे व सर्व ग्रामस्थ ग्रामस्थ हजर होते
