शासन आदेशाचे पालन करत गणेशोत्सव साजरा करा: पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण
(सांगरुळ येथे ग्रामपंचायत व गणेशोत्सव मंडळांची बैठक)
(करवीर):
व्यक्तिगत व धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घेत शासन आदेशाचे पालन करत यंदाचा गणेशोत्सव शांततेच्या मार्गाने साजरा करा यासाठी पोलीस प्रशासन सहकार्याची भूमिका घेईल अशी ग्वाही करवीरचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण यांनी दिली . सांगरूळ येथे ग्रामपंचायत व गावातील गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते .अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे होते .
यावेळी चव्हाण यांनी गणेशोत्सव मंडळांनी ध्वनी मर्यादेबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे . मंडळाचे स्टेज घालताना वाहतुकीस अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी . मिरवणुका वेळेत व शांततेच्या मार्गाने पार पाडण्यात असे आवाहन केले .
गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी गावातील तरुण मंडळांनी गणेशोत्सवासह इतर सामाजिक कार्याच्या माध्यमातून चांगले काम केले आहे. आजच्या युवा पिढीला चांगले संस्कार होण्यासाठी तसेच एखाद्या किरकोळ वादावादीमुळे युवकांचे करिअर अडचणीत येऊ नये यासाठी शांततेच्या मार्गाने गणेशोत्सव साजरा करूया असे सांगून यासठी ग्रामपंचायत प्रशासन सहकार्य करेल अशी ग्वाही दिली .
यावेळी राजाराम लोंढे यांनी
गणेशोत्सवामध्ये सांगरूळच्या तरुण मंडळांनी दर्जेदार सजीव देखाव्याच्या माध्यमातून गावाचा नावलौकिक जिल्हाभर केला आहे .याला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन गणेश मंडळांनी शांततेच्या मार्गाने स्टेशन व रोडसिन सादर करत गणेश उत्सव साजरा करावा आवाहन केले .यावेळी तरुण मंडळाच्या वतीने सुहास भोसले,प्रमोद नाळे ,भरत यादव, तानाजी खाडे,यांनी सूचना मांडल्या .ग्रामपंचायत सदस्य सागर खाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले .
यावेळी कुंभीचे माजी संचालक भरत खाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णात खाडे , बाळासाहेब यादव ,विष्णुपंत खाडे ,बदाम खाडे ,सुभाष सुतार ,बाळासो खाडे,सचिन नाळे , रविद्र खाडे ,उत्तम कसोटे ,मच्छिद्र मगदूम ,बाजीराव तळेकर, अनिल घराळ यांचे सह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावातील तरुण मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते . आभार गजानन लव्हटे यांनी मानले .