पॅक्स टू मॅक्स योजनेद्वारे विकास संस्थांना बळकटी मिळेल : आम. पी.एन.पाटील
(नाबार्डच्या योजनेतंर्गत करवीर तालुक्यातील विकास संस्थांना कर्ज मंजुरी पत्राचे वाटप)
करवीर :
प्राथमिक शेती पतपुरवठा संस्थाचे (PACS) बहुद्देशीय सेवा केंद्रामध्ये (MACS) रूपांतर करून विकास संस्थांचा कायापालट करणेसाठी नाबार्डने पॅक्स टू मॅक्स योजना सुरू केली आहे. संस्थांना आत्मनिर्भरता प्राप्त होण्यासाठी ही योजना सहायभूत ठरणार आहे. या योजनेद्वारे विकास संस्थांना बळकटी मिळेल, असे प्रतिपादन केडीसीसी बँकेचे ज्येष्ठ संचालक आमदार पी.एन.पाटील यांनी केले.
नाबार्डच्या पॅक्स टू मॅक्स योजनेतंर्गत राज्य सहकारी बँक, केडीसीसी बँकेच्या माध्यमातून करवीर तालुक्यातील श्रीपत विकास (खुपिरे),वाकरे विकास (वाकरे), नागदेववाडी विकास (नागदेववाडी), भावेश्वरी विकास (नागाव), हनुमान विकास (इस्पुर्ली),
विकास संस्थांना कर्ज मंजुरी पत्राचे वाटप आम. पाटील यांच्या हस्ते फुलेवाडी येथील कार्यालयात करण्यात आले.
यावेळी आम. पी.एन.पाटील म्हणाले, या योजनेद्वारे विकास संस्थांना विविध व्यवसाय सुरू करता येणार आहे. त्यासाठी ४ % व्याजदराने कर्ज मिळत आहे. नियोजनबद्ध कामकाज केल्यास विकास संस्थाना व्यावसायिक स्वरूप प्राप्त होईल. त्यासाठी जास्तीत जास्त विकास संस्थांनी या योजनेत सहभागी व्हावे.
याप्रसंगी नामदेव दत्तू चौगले, भैरवनाथ विकास संस्था(म्हारुळ), साताप्पा लहू बाटे,
ज्ञानू रामा पाटील विकास संस्था (उपवडे), शंकर हरी पाटील, श्रीराम कृष्ण विकास संस्था ( साबळेवाडी) या मयत सभासदांच्या वारसांना केडीसीसी बँकेच्या वतीने अपघात विमा मंजूर चेकही देण्यात आले.
पॅक्स टू मॅक्स योजनेत तालुक्यातील हरी रामजी पाटील विकास (सडोली खालसा),पांडुरंग विकास (सोनाळी), वडणगे विकास (वडणगे), हिरवडे विकास (हिरवडे खालसा), बलभीम विकास (खेबवडे),केदारलिंग विकास (दोनवडे),शेती सेवाश्रम विकास (वळीवडे),केदारलिंग विकास (कोथळी),कुरुकली विकास (कुरुकली), भावेश्वरी विकास (गणेशवाडी) या विकास संस्था सहभागी झाल्या आहेत. यावेळी केडीसीसी बँकेचे अधिकारी, सेवा संस्थेचे पदाधिकारी, सचिव उपस्थित होते.