Rs 2000 Notes Withdrawn from Circulation : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शुक्रवारी मोठा निर्णय घेतला, २ हजारांच्या नोटा वितरणातून बाहेर काढल्या आहेत. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत आपल्याकडच्या २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत.

२० हजार रुपये म्हणजेच एका वेळी १० नोटा जमा करता येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी २ हजार रुपयांची नोट वितरणातून काढण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु २ हजार रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा (legal tender) म्हणून सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने “इतर मूल्यांच्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत,” असे कारण देत २ हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं २००० च्या नोटा वितरणातून काढून घेतल्या असल्या तरी त्या नोटा सध्या अवैध ठरणार नाहीत. त्या आपल्याला दिलेल्या मुदतीपर्यंत जमा करता येणार आहेत.

८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन ५०० आणि २००० च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजाराची नोट बाजारात आली होती. त्यानंतर आरबीआयने २०१९ पासून २ हजारांच्या नोटांची छपाईसुद्धा बंद केली होती.

२०१८-१९ ला छपाई थांबवली
दोन हजार रुपयांची नोट आरबीआय कायदा १९३४ च्या कलम २४ (१) अंतर्गत आणण्यात आली. जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर चलनाच्या गरजेमुळे २ हजारांच्या नोटा बाजारात आणल्या गेल्या. ५०० ची नोट बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यानंतर २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश काहीसा फोल ठरला. त्यामुळे २०१८-१९ मध्ये २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!