कोल्हापूर:ता. ०६ आपल्या सर्वाचे भाग्यविधाते आणी ज्यांनी सर्व उपेक्षित दिनदलित घटकांच्या उन्नतीसाठी व उद्धारासाठी दिशा दिली. आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना १०१ व्या स्मृती दिनानिमित्त आज सकाळी १० वाजता गोकुळच्या ताराबाई पार्क येथे १०० सेकंद स्तब्ध राहून कृतज्ञता पूर्वक आदरांजली वाहून छ.शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृतिदिना निमित्ताने मानवंदना केली.यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व संचालकसो यांच्या उपस्थितीत ताराबाई पार्क येथे राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना विश्वासराव पाटील म्हणाले कि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या योगदानामुळे आज सहकारी तत्वावर चालण्याऱ्या विविध संस्था उद्योग व्यवसायामुळे कोल्हापूर जिल्हा हरितक्रांतीत व श्वेतक्रांतीत महाराष्ट्रात अग्रेसर आहे. कोल्हापूर जिल्ह्याने सहकार,उद्योग,कृषि क्षेत्रात जी प्रगती केली आहे तिचा पाया शाहू महाराजांच्या काळात कृषी औद्योगिक सहकार धोरणांनी रचला गेला तसेच सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील व जेष्ट संचालक अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले,कर्णसिंह गायकवाड,संभाजी पाटील,प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर,बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील,डेअरी मॅनेजर अनिल चौधरी आस्थापना व्यवस्थापक डी.के.पाटील,व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.यु.व्ही.मोगले, संकलन व्यवस्थापक एस.व्ही. तुंरबेकर,संघाचे अधिकरी व कर्मचारी उपस्थित होते.