- गोकुळ अध्यक्ष विश्वासराव पाटील कोल्हापूर :
शिरोली दु.येथे डॉ.अतिग्रे हॉस्पिटल आणि डॉ.गडकर आय हॉस्पिटल, संचालित कै.जनाबाई नारायण पाटील डोळ्याचा दवाखाण्याचे व श्री.गणेश क्लिनिकच्या नुतून वास्तूचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील यांचे शुभ हस्ते व डॉ.संदीप श्रावस्ती, डॉ.आर.जी.अतिग्रे, डॉ अमित गडकर, डॉ.श्याम माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले.
या कार्यक्रम प्रसंगी विश्वासराव पाटील म्हणाले, या हॉस्पिटल मध्ये नव्याने सुरु झालेला ग्रामीण भागातील हा पहिलाच डोळ्याचा दवाखाना आहे. शिरोली दु. परिसरातील तसेच ग्रामीण भागातील जनतेची लोकसंख्या पाहता. रुग्णांना याचा फायदा होईल. तसेच या ठिकाणी सुरु होत असलेल्या प्राथमिक नेत्र तपासणी,उपचार, सेवा सुविधांसह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या रुग्णालयामार्फत केले जाईल. कै.जनाबाई नारायण पाटील नेत्र रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधा नागरिकांनसाठी उपयुक्त ठरतील. यावेळी डॉ.अतिग्रे कुटुंबियांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल कौतुक केले.
डॉ.अमित गडकर म्हणाले कि या रुग्णालयातील अल्पदरात डोळ्याची तपासणी ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया , कॉम्पुटरराईज्ड डोळे तपसणी, मधुमेहावरील नेत्रपटल निदान व उपचार, विनाटाका, विनाभूल फेको मोतीबिंदू शस्त्रक्रिया,नेत्रपटल लेसर शस्त्रक्रिया, नवजात बालकाचे नेत्रपटल व निदान व उपचार अश्या अनेक सुविधा डॉ.अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णालयात उपलब्ध असणार आहेत.
या कार्यक्रमवेळी हॉस्पिटल मधील नवीन विभागांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.आर.कांबळे सर यांनी केले तर आभार अक्षय व्हरपे यांनी मानले.
याप्रसंगी, संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील, डॉ.संदीप श्रावस्ती, डॉ.आर.जी.अतिग्रे, डॉ अमित गडकर, डॉ.श्याम माने,डॉ.राजश्री अतिग्रे, डॉ स्नेहल गडकर,डॉ.विजय अतिग्रे, डॉ मोरे, सचिन पाटील भैया, , वरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापूरे,माधव पाटील ,बाजीराव पाटील, सुभाष पाटील, एस.के.पाटील ,माजी पंचायत समिती सदस्य सुनील पाटील, एस.के.पाटील,चेतन पाटील, अभिजित पाटील,गणपती अतिग्रे, भागातील वैदकीय क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.