पश्चिम महाराष्ट्रातील दुसरी व्यक्ती
८७ महिलांना रक्त,आणि
११८ वेळा रक्तदान करणारी
कोल्हापूर :
सन १९९७ मध्ये आपल्या बहिणीला रक्त मिळाले नाही,यावेळी सायकलने ब्लड बँकेचे उंबरे झीजवले,आणि त्यांनी याच घटनेतून बोध घेऊन ८७ महिला भगिनींना आतापर्यंत रक्त दिले आहे. आणि तब्बल ११८ वेळा रक्तदान केले आहे.
इतक्या वेळा रक्तदान करणारे रेकॉर्ड ब्रेक रक्तदाते म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील हा दुसरा व्यक्ती ठरला असून शेकडो रुग्णांच्या जीवनात आनंद देणारा हा आंनदा जाधव नावाचा व्यक्ती आहे.
यावेळी बोलताना आंनदा जाधव म्हणाले प्रसिद्धी साठी कधीच रक्तदान नाही केले, जागेवर जाऊन रक्त दिले. ना फोटो,ना इव्हेंट, दान म्हणजे रक्तदान,मरावे परी कीर्ती रुपी उरावे अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बालिंगा ता करवीर येथील आनंदा गणपती जाधव यांची सर्वांना प्रेरणादायी अशी कहाणी आहे.यावेळी अनुभव सांगताना आंनदा म्हणाला माझा दुर्मिळ असा ए निगेटिव्ह रक्त गट आहे. सन १९९७ मध्ये आपल्या बहिणीला प्रसूती दरम्यान रक्त मिळाले नाही,त्यावेळी सायकलने ब्लड बँकेचे उंबरे झीजवले,आणि या घटनेतून बोध घेऊन जागेवर जाऊन रक्त देण्यास मी सुरुवात केली.यामध्ये ८७ महिला भगिनींना आतापर्यंत रक्त दिले आहे.
गेली २७ वर्षे राज्यभरात गरज असेल तिथे पोहचून रक्त देत आहे.११८ वेळा रक्त दिले आहे. दरम्यान ११८ वेळा रक्तदान करणारे रेकॉर्ड ब्रेक रक्तदाते ठरले असून पश्चिम महाराष्ट्रातील ही दुसरी व्यक्ती ठरली आहे.
आनंदा जाधव यांनी रक्तदान घटना याबाबत आपले सांगितलेले अनुभव
रक्तदान आणि गैरसमज…….
पाहिले रक्तदान केले यावेळी घरच्यांनी काही प्रमाणात विरोध दर्शविला, मात्र पुढे सपोर्ट दिला.अनेक वेळा रक्तदान करणे बाबत गैरसमज आहेत.याउलट
रक्तदान केलेनंतर पुन्हा ऊर्जा मिळते. मी इतक्या वेळा रक्त दिले हा प्रत्यक्ष अनुभव समोर आहे.
रक्तदान आणि राखी…..
पुण्यातील एक महिला रेश्मा शहा यांना ए निगेटिव्ह रक्त लागत होते. यावेळी त्यांना पुण्यात जाऊन रक्त दिले. यानंतर त्या महिलेचा जीव वाचला यानंतर जाधव आणि शहा यांच्यात बहिण भावाचे नाते निर्माण झाले. त्या शहा यांनी रक्षाबंधनाला
सहा लाखाची राखी घेतली. मात्र त्यांना इतकी महाग राखी का घेतली.मी अशी राखी स्वीकारणार नाही,मला मायेची रेशीम राखी पाठवावी अशी विनंती केल्यानंतर त्यांनी रेशीम राखी पाठवली.
देश हितासाठी….
२००३ मध्ये अतिरेकी हल्ल्यात कर्नल अमरसिंह वर्मा यांच्यावर हल्ला झाला होता.त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते तातडीने त्यांना ए निगेटिव्ह रक्ताची गरज होती. त्यावेळी त्यांना पुणे मिलिटरी कॅन्टीन येथे जाऊन रक्तदान केले,यातून देश हितासाठी हे रक्त दान झाल्याची भावना जाधव यांनी व्यक्त केली.
बहीण भावाचे नाते…..
महेश्वरी अग्रवाल या कोल्हापूरच्या असून त्या फ्रान्समध्ये राहतात. त्यांची प्रसूती कोल्हापुरात झाली, यावेळी त्यांना रक्ताची गरज होती. त्यांना रक्त दिले आजही त्या फ्रान्स मधून संपर्क करतात, आम्ही बहिण भावाचे नाते जपले आहे. आतापर्यंत अशा ८७ महिला भगिनींना रक्त दिले आहे.या सर्व आता माझ्या बहिणी असून माझे भावा बहिणीचे नाते निर्माण झाले आहे.
शब्दात सांगता येत नाही इतका आंनद मिळतो असे आंनदा म्हणाला.
जागेवर जाऊन रक्त दिले ….
वैष्णवी पाटील या मसुद गाव कराडच्या, त्यांना प्रसूतीच्या वेळी रक्त मिळत नव्हते, त्यांना जागेवर जाऊन रक्त दिले .यामुळे त्यांचा जीव वाचला त्यांच्या मुलाचा जीव वाचला, यावेळी त्या महिला दवाखान्यातून डिस्चार्ज घेतल्यानंतर आंनदा यांना भेटल्याशिवाय घरी जाणार नाही असा त्यांनी हट्ट धरला आणि मला भेटूनच त्या घरी गेल्या.