कोल्हापूर :
टाऊन हॉल आणि सीपीआर च्या इमारती सुसज्ज देखण्या आहेत, याप्रमाणे करवीरच्या उज्वल परंपरेचा बाज करवीर तहसील इमारतीला देण्यात येणार असून हेरिटेज प्रमाणे देखणी वास्तू उभारणार आहे. यामुळे कोल्हापूरच्या पर्यटनात आणखी एका इमारतीची भर पडणार आहे. करवीर तहसील कार्यालयाची इमारत सुसज्ज होणार असून एप्रिल अखेर बांधकामाला सुरुवात होणार आहे. तहसील ऑफिस बी टी कॉलेजमध्ये सुरू झाले असले तरी करवीर पोलीस ठाणे स्थलांतरित झालेले नाही.१८ महिन्यात बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्यानंतर तहसीलदार
कार्यालय बी टी कॉलेज मध्ये स्थलांतर झाले आहे. करवीर तालुक्यात वाड्यावस्त्यासह १३२ गावे आहेत. तालुक्यात कोल्हापूर शहर ,उत्तर ,दक्षिण ,करवीर मधील कामे या कार्यालयात चालतात,
करवीर तहसीलदार ऑफिसला शेतकरी व पोलीस स्टेशन मध्ये दिवसभरात हजारो लोक येतात.
या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नव्हती, वर्दळीच्या ठिकाणी हे कार्यालय असल्यामुळे कार्यालयाच्या पुढे नेहमी वाहतुकीची कोंडी होत होती,याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. गेली ५० वर्षाहून अधिक काळ तहसील व पोलीस ठाणे या ठिकाणी आहे.
जागा अपुरी असल्यामुळे लॉक अप गांधीनगरला असून आरोपींना गांधीनगरला पाठवावे लागत होते. अशावेळी कोल्हापुरात वाहतुकीची कोंडी झाल्यास आरोपींना कोर्टात पोहोचवणे, पोलिसांना जिकिरीचे बनले होते.
तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या व आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या मार्चच्या बजेट मधून १४ कोटीच्या निधी निधीला मंजुरी मिळाली होती. या कामाची टेंडर वर्क ऑर्डर झाली आहे.
टाऊन हॉल इमारतीप्रमाणे या इमारतीला हेरिटेज लुक देण्यात आला आहे. यामुळे सुंदर आणि देखणी वास्तू पाहायला मिळणार आहे.
करवीर पोलीस ठाणे भगवा चौक येथे कॉटर्समध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग सूत्रांनी दिली. दरम्यान पोलीस ठाणे स्थलांतरित न झाल्यास काम पुढे जाण्याची शक्यता आहे.
………..
*करवीर पोलीस ठाणे भगवा चौक येथे स्थलांतरित होणार,
- १४ कोटीचा निधी ,
- एप्रिल अखेर काम सुरू होण्याची शक्यता,
- चार मजली इमारत होणार, खाली दोन मजली पार्किंग, वरती दोन मजले कार्यालय,
- आणखी दोन मजल्यासाठी सात कोटी निधीची गरज,
- तहसीलदार कार्यालयासमोरील वाहनांची गर्दी होणार कमी.
………………
वैभव जाधव, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग,
करवीर तहसीलदार जुन्या इमारतीचे सात दिवसात बांधकाम पाडण्यास सुरू होणार , एप्रिल अखेर बांधकाम सुरू होईल, १८ महिन्यात बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी आहे.