जिल्ह्यातील ४४ शेतकऱ्यांच्या वारसांना ८७ लाख मंजूर
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्यात शेतात काम करताना अपघातामध्ये अपंगत्व आलेल्या एक व अपघातात मृत्यू पावलेल्या ४३ शेतकऱ्यांच्या वारसांना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत ८७ लाख मंजूर झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या वारसांना एक आर्थिक हातभार लागणार आहे.
पावसाळा व शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांचा अनेक कारणांनी अपघात होऊन कुटुंबाची वाताहत होते . अशा वेळी शासनाकडून शेतकरी कुटुंबास आर्थिक स्थैर्य मिळावे या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वकांक्षी लाभाची असलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केलेली आहे .
या योजने अंतर्गत सन २०२१/२२ या वर्षी करिता दिनांक ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ कालावधी पूर्ण झाला होता .त्यानंतर पुढील काळात ही योजना बंद होती . महाराष्ट्र शासनाने याबाबत दखल घेऊन एक विशेष बाब म्हणून २८ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन दिनांक ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या खंडित कालावधीतील विमा दाव्याना शासन स्तरावर मंजुरी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते .
या कालावधी मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १३३ अपघातग्रस्त शेतकरी असून त्यांच्या वारसदारानी पूर्वसूचनेदवारे खात्याकडे नोंद दिलेली आहे . त्यापैकी १६६ प्रस्ताव प्राप्त झाले असून ९३ परिपूर्ण प्रस्ताव कृषि आयुक्तालय पुणे येथे मंजुरीसाठी सादर केले होते.
कोल्हापूर जिल्हयातील १०६ दाव्या पैकी पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर जिल्यातील अपघातामध्ये अपंगत्व आलेल्या १ शेतक – यास एक लाख व अपघातात मृत्यू पावलेल्या ४३ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये याप्रमाणे ४४ शेतक – यांना ८७ लाख मंजूर झालेले आहेत.
कृषि आयुक्तालय स्तरावरून जिल्हा कार्यालयास हा निधि नुकताच प्राप्त झाला आहे . जिल्हा स्तरावरून त्याचे वितरण संबधित ४४ शेतकऱ्यांच्या वारसाच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे . उर्वरित ६२ दावे प्रलंबित असून शासन स्तरावरून त्यास लवकरच मंजूरी मिळेल अशी आशा आहे.
अपघात ग्रस्त संबंधित शेतकरी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन
कृषी पर्यवेक्षक संजय सुतार यांनी केले आहे.
……………
जलिंदर पांगरे , जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक,
सन २०२२-२३ मध्ये दिनांक ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये कोणत्याही शेतक – यास अपघाताने आपगत्व आले असेल किंवा मृत्यू झालेला असेल,तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघातग्रस्त शेतकरी व त्यांचे वारसदार यांनी विमा दावे प्रस्ताव सादर करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी , मंडळ कृषी अधिकारी ,कृषी सहायक ग्राम पातळीवरील कृषी पर्यवेक्षक यांचेशी संपर्क करावा.