आम.पी.एन. यांनी मतापेक्षा विकासाला प्राधान्य दिले : रामचंद्र भोगम
(३ वर्षात मल्लेवाडीच्या विकासासाठी ८९ लाख ५० हजारांचा निधी )
करवीर :
मल्लेवाडीसारख्या केवळ ९० मते असलेल्या छोट्या वाडीमध्ये आम. पी.एन.पाटील यांनी या कमी मतांचा विचार न करता ३ वर्षात तब्बल ८९ लाख ५० हजारांचा भरघोस निधी विकासासाठी दिला आहे. आम. पाटील यांनी मतापेक्षा विकासाला प्राधान्य दिले असल्याचे गौरवोदगार उद्योजक रामचंद्र भोगम यांनी काढले.
मल्लेवाडी (ता.करवीर) येथील आम. पी.एन.पाटील यांच्या माध्यमातून व रामचंद्र भोगम यांच्या पाठपुराव्यातून विविध स्वरूपाच्या सुमारे ३५ लाखाच्या विकासकामांचा प्रारंभ गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. माजी सरपंच बळवंत पाटील उपस्थित होते.
यावेळी भोगम म्हणाले, करवीर तालुक्यातील वाड्यावस्तीवरील तेरसवाडी, भोगमवाडी, कदमवाडी आदी गावे विकासापासून वंचित होती. आम. पाटील यांनी या परिसरातील विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला आहे. मते किती यापेक्षा विकासकामे महत्वाची मानणाऱ्या आम. पाटील यांच्या उदात्त धोरणाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहेत.
यावेळी माजी सरपंच बबन कदम, बाजीराव आवाड, बळवंत पेंढरे, गणपती आवाड, तुकाराम आवाड, तुकाराम ऱ्हायकर, राजू भोगम, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. आभार कॉन्ट्रॅक्टर सागर ढेरे यांनी मानले.
फोटो : मल्लेवाडी (ता.करवीर) येथे आम.पी.एन.पाटील यांच्या माध्यमातून होणाऱ्या विविध कामांचा प्रारंभ करताना गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, उद्योजक रामचंद्र भोगम, बळवंत पाटील आदी.