गोकुळचा’ ६० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा …

कोल्‍हापूरः ता.१६. गोकुळ दूध संघाची स्‍थापना १६ मार्च १९६३ इ. रोजी ७०० लिटर दूध संकलनावर झाली. आज ७०० लिटर वरुन सध्या प्रतिदिनी सरासरी १४ लाख लिटर दूध संकलन होत आहे. यासाठी दूध उत्‍पादक शेतकरी, दूध संस्‍था, व कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे असून त्‍यांच्‍या सहकार्यामुळेच गोकुळ २० लाख लिटरचे उध्दिष्‍ठ साध्‍य करेल असा विश्‍वास संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी व्‍यक्‍त केला. गोकुळच्‍या ६०व्या वर्धापन दिनानिमीत्‍य गोकुळ दूध संघाच्‍या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सत्यनारायण पूजा अजित नरके यांच्या हस्ते संपन्न झाली, सन २०२२ -२३ सालातील गोकुळश्री स्पर्धेतील विजेते स्पर्धकान बक्षीस वितरण करण्यात आले, तसेच संघाच्‍या कर्मचा-यांना ‘गुणवंत’ कामगार पुरस्‍कार देवून सन्‍मानित करणेत आले व संघाच्‍या मार्केटिंग विभागामार्फत कोल्‍हापूर, पुणे व मुंबई येथील जास्‍तीत-जास्‍त दूध विक्री करणा-या दूध वितरकांचाही सत्‍कार करणेत आला. प्राचार्य मधुकर पाटील यांचे कर्मचार्यांसाठी गोकुळ: सहकारातून समृद्धीकडे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तसेच सध्याच्या आधुनिक युगामध्ये जगभरातील लोक सोशल मिडीयाचा वापर त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये वेगवेगळ्या उत्पादनांची माहिती घेणेसाठी करत आहोत. हे ओळखून जगभरातील प्रतिथयश कंपन्यानीही सोशल मीडियाचा वापर त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी सुरु केला आहे.गोकुळ दूध संघानही स्वतःचे अधिकृत ‘गोकुळ मिल्क ऑफिशयल’ या नावाने यूटयूब चॅनेल सुरु केले आहे. अशा विविध कार्यक्रमानी हीरक महोत्सव वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

सन-२०२२-२०२३ मधील “गोकुळश्री” स्‍पर्धे मधील म्‍हैस विजेते स्‍पर्धक नावे खालील प्रमाणे

१.अरुंधती महिला लिंगनूर क.नूल,ता.गडहिंग्‍लज
सौ.अर्चना उमेश खांडेकर
२०.१४० लिटर
बक्षीस : २५,०००/-

२.श्री.बसवेश्वर पिंपळगाव,ता.कागल
सौ.गीता संजय पाटील

१९.१२०लिटर
बक्षीस : २०,०००/-

३ श्री.महालक्ष्मी दुंडगे,ता.गडहिंग्लज
श्री.किरण बाबूराव सावंत

१८.९०५ लिटर
बक्षीस १५,०००/-
——————-==============——————
सन-२०२२-२०२३ मधील “गोकुळश्री” स्‍पर्धे मधील गाय विजेते स्‍पर्धक नावे खालील प्रमाणे

१.मा.आम.कै.किसनराव मोरे सरवडे,ता.राधानगरी
श्री. शांताराम आनंदा साठे

बक्षीस २०,०००/-

२.श्री.गायत्री अत्‍याळ,ता.गडहिंग्‍लज
सौ. सविता गजानन पाटील

बक्षीस १५००० /-

३ श्री. हनुमान वडकशिवाले,ता.करवीर
सौ. शारदा बाबुराव पाटील

बक्षीस १०,०००/-
—————–==============——————

तसेच यावेळी संघामध्‍ये उत्‍कृष्ठ का‍मगिरी केलेल्‍या खालील तीन कर्मचा-यांना “गुणवंत कामगार” पुरस्‍काराने सन्‍मानित करणेत आले. या पुरस्‍कारामध्‍ये रोख १०,०००/-रुपये, स्‍मृति चिन्‍ह, व प्रशस्ती पञ देवून सपत्‍नीक सत्‍कार करणेत आला.

संघाच्‍या खालील कर्मचा-यांना ‘गुणवंत’ कामगार पुरस्‍कार देवून सन्‍मानित करणेत आले.

१ श्री.तानाजी लक्ष्‍मण नलगे

क्‍लार्क /टेस्‍टर,कोल्‍हापूर,
सॅटेलाईट डेअरी उदगांव

२श्री. अरविंद गणपती पाटील

वरिष्‍ठ गुणनियंत्रण अधिकारी शिरोली दु.ता.करवीर
गोकुळ गुणनियंत्रण

३ श्री.संजय बाबुराव पाटील

सिनि.लॅब अटेडंट, देसाईवाडी ता.भुदरगड
बोरवडे शितकरण केंद्र

—————–==============——————

तसेच यावेळी संघाच्‍या मार्केटिंग विभागामार्फत कोल्‍हापूर, पुणे व मुंबई येथील जास्‍तीत-जास्‍त दूध विक्री करणा-या दूध वितरकांचाही सत्‍कार करणेत आला.

खालील कोल्‍हापूर विभागातील दूध वितरकांचा सत्‍कार करणेत आला.

१. मे.यशवंत ता.सह.खरेदी विक्री संघ पन्‍हाळा
बक्षीस २५,०००/-

२ सौ.अर्चना अरूण कुलकर्णी
बक्षीस १५,०००/-

३. श्री.प्रविण शंकर गोळे
बक्षीस १०,०००/-

        तसेच स्‍वागत व प्रास्‍ताविक संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले तर आभार संचालक अजित नरके यांनी मानले. यावेळी गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, नविद मुश्रीफ, बाबासाहेब चौगले, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, आस्थापना व्यवस्थापक डी.के.पाटील, वित्त व्यवस्थापक हिमांशू कापडिया, मार्केटींग व्यवस्थापक हनमंत पाटील आदि उपस्थित होते.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!