कुंभी कासारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी चंद्रदीप नरके, उपाध्यक्षपदी विश्वास पाटील यांची बिनविरोध निवड
करवीर :
कुंभी कासारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रदीप नरके व उपाध्यक्षपदी विश्वास पाटील कोगेकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी काम पाहिले.
निवडीनंतर अध्यक्ष नरके यांनी चार पंचवार्षिकमध्ये सभासदांनी आमचेवर विश्वास दाखविला. या विश्वासामुळेच आमचे संपूर्ण पनेल निवडून दिले आहे. याबद्दल सभासद, कर्मचारी, तोडणी वाहतूकदार यांचे आभार मानले.
आज अध्यक्षपदी चंद्रदीप नरके यांचे नाव संचालक अनिल पाटील यांनी सुचविले, पी.डी.पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी विश्वास पाटील यांचे नाव संचालक अनिष पाटील यांनी सुचविले,त्यास संजय पाटील यांनी अनुमोदन दिले.
यावेळी डॉ. बि.बी. पाटील,दादासो लाड यांचे मनोगत झाले. आभार विश्वास पाटील यांनी मानले. यावेळी संचालक किशोर पाटील, उत्तमराव वरुटे, अनिल पाटील, विलास पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर उपाध्यक्ष पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.