आमदार सतेज बंटी पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी नियुक्ती.

मुंबई, दि. 2 मार्च

राज्याचे माजी गृहराजयमंत्री व विधान परिषद सदस्य सतेज बंटी पाटिल यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गो-हे यांनी आज सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा केली

सतेज बंटी पाटील हे यांनी कोल्हापूर जिल्हयात पक्ष संघटना वाढीस चालना दिली आहे. 2010- 14 च्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2019 च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहराज्य मंत्री, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन अशाविविध विभागांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.

“काँग्रेस पक्षाने आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आता पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे, या पदालाही न्याय देण्याचा प्रयत्न करू”. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार व्यक्त करतो”, असे सतेज पाटील म्हणाले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!