कुंभी कारखाना निवडणूक : दोन्ही पॅनेल प्रमुखांनी बजावला मतदानाचा हक्क : दोन्हीकडून विजयाचे दावे
कोल्हापूर :
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. स.ब.खाडे महाविद्यालय कोपार्डे येथे सकाळी ९ वाजता सत्ताधारी नरके पॅनेलचे प्रमुख अध्यक्ष चंद्रदीप नरके तर विरोधी राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलचे प्रमुख बाळासाहेब खाडे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
या केंद्रावर सकाळी साडेआठ वाजता माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, त्यानंतर गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी मतदान केले.
मतदानानंतर दोन्ही पॅनेल प्रमुखांनी कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रावर भेटी देण्यास सुरुवात केली. गावागावांत सर्व मतदान केंद्रावर सकाळी आठ वाजलेपासून मतदानास सुरुवात झाली आहे.