सत्ताधाऱ्यांनी लबाडीचा धंदा बंद करावा : एकनाथ पाटील
कुडित्रे येथील राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलची सभा
कोल्हापूर :
भूमिपुत्रांना किती त्रास दिला हे सर्वांना माहीत आहे. आम्ही जमिनी कारखान्यासाठी दिल्या आहेत. आमच्या हृदयात कारखाना आहे. विरोधक नवीन कामगारांना काढून टाकतील अशा अफ़वा सत्ताधारी पसरवत आहेत. मात्र आम्ही सत्तेवर आल्यास एकाही कामगाराच्या नोकरीला धक्का लागणार नाही तसेच कारखाना कर्जमुक्त करू. अहवालच खोटा देणारे सत्ताधारी आणखी किती लबाड बोलणार. त्यांनी लबाडीचा धंदा बंद करावा अशी टिका यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले,
कुडित्रे येथील राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलची सभा झाली , अध्यक्षीय भाषणात संभाजी पाटील म्हणाले, शाहू आघाडीने संकट काळात काटकसरीने कारभार करत नफा ठेवून सत्ता सोडली. आज कारखाना कर्जाच्या खाईत लोटला.
गोकुळ संचालक चेतन नरके म्हणाले,
यांच्या अहवालातच खोट आहे. एक खड्डा काढून दुसरा खड्डा म्हणजे कर्ज काढून बिले दिले आहेत. याने कर्ज कुठे कमी झाले. कुंभीच्या कारभाराला गैरव्यवस्थापनाची कीड लागली असल्याची घणाघाती टीका करून सत्तातर घडवू आणि कारखाना वाचवू असे आवाहन केले.
प्रा.टी.एल.पाटील म्हणाले, अध्यक्ष नरकेंना आमदारकीची स्वप्ने पडली आणि कारखाना घाईला आणला. आर्थिक कुवत नसताना प्रकल्प लादले. पाळीपत्रकाचा पत्ताच नाही अशी टीका करत
कुडित्रे, कोपार्डेचे जमिनी देण्यात मोठे योगदान आहे. त्यामुळे आता ही गावेच सत्तातर घडवतील.
यावेळी बाळासाहेब खाडे, राजेंद्र सूर्यवंशी, प्रकाश देसाई, बाजीराव खाडे, दादू कामिरे, प्रकाश मुगडे यांची भाषणे झाली. पै.संभाजी पाटील, आनंदराव पाटील, बी.एच.पाटील यांच्यासह पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.