कारखाना खाजगीकरणापासून वाचविण्याची हीच वेळ आहे परिवर्तनाची : माजी शिक्षण सभापती रसिका पाटील
(राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन)
कोल्हापूर :
कुंभी कारखान्याची अवस्था चिंताजनक आहे. आज प्रत्येक शेतकऱ्यांला ऊस कारखान्याला घालवायला अनेक कष्ट घ्यावे लागत आहेत. आमचे कुटुंबही राजकीय असले तरी शेतकरी कुटुंब आहे. आजही आमचे सासरे शेतात काम करतात. त्यांना शेतातला ऊस कारखान्याला कसा आणि कधी घालवायचा या चिंतेने असह्य होताना आम्ही पाहिले आहे. सभासदांची अशी अवस्था केविलवाणी बनली आहे.
कर्जबाजारी झाल्याने कारखाना खाजगीकरणाच्या घशात जाईल. आणि त्यामुळेच कारखाना खाजगीकरणापासून वाचविण्याची हीच वेळ आहे परिवर्तनाची. नाही तर आपल्यावर फक्त बघत बसायची वेळ येईल. सर्व सभासद बंधू भगिनींनो आमच्या पॅनेलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांच्या कपबशी समोर शिक्का मारून विजयी करा. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण व अर्थ सभापती रसिका अमर पाटील यांनी केले.
वाकरे येथे राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलच्या सभेत त्या बोलत केली. अध्यक्षस्थानी पै.अशोक माने होते. यावेळी कोपार्डे येथील बाजीराव दत्तू पाटील यांनी आपल्या समर्थकासह पाठींबा दिल्याने पॅनेलचे प्रमुख बाळासाहेब खाडे यांच्या
हस्ते त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके, पॅनेलचे प्रमुख गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, यशवंत बँक चेअरमन एकनाथ पाटील, दादू कामिरे, बाजीराव खाडे, प्रकाश देसाई, राजेंद्र सूर्यवंशी, कॅप्टन उत्तम पाटील शिंगणापूरकर, सूरज पाटील यांची भाषणे झाली.
प्रारंभी प्रा.वसंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. सभेला भगवान पाटील, जयसिंग पाटील, संभाजी पाटील, आर.डी.पाटील, विठ्ठल तोरस्कर, हिंदुराव तोडकर, विजय पोवार, सागर सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील नेते, पदाधिकारी, वाकरे गावचे सभासद, महिला उपस्थित होत्या.