कुंभीवर परिवर्तनाचं वणवा पेटला,कपबशीचा
विजय निश्चित, स्नेहल पाटील यांचा महिलांचा घरोघरी प्रचार
कोल्हापूर :
कुंभीवर परिवर्तनाचं वणवा पेटला असून ,
राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलच्या कपबशीचा
विजय निश्चित आहे.असे प्रतिपादन स्नेहल उत्तम पाटील यांनी केले. कोपार्डे ता. करवीर येथे महिलांची घरोघरी प्रचार फेरी झाली. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी पाटील म्हणाल्या,राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेल प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहे. ऊस उत्पादकांना विनंती आहे, कुंभी कारखाना सभासदांच्या मालकीचा राहण्यासाठी राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलला साथ द्यावी, माझे कुटुंब शेतकरी कुटुंब आहे .आज शेतकऱ्यांना ऊस घालवण्याची चिंता आहे. स्वतः हातात खुरपे घेऊन ऊस तोडणी करावी लागत आहे. हीच ऊस पाठवण्याची अडचण संपूर्ण कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांच्या समोर आहे. आणि शेतकरी हीच खंत आमच्यासमोर व्यक्त करत आहेत. यामुळे परिवर्तन अटळ आहे.
आज स्नेहल पाटील, राजश्री पाटील या महिला उमेदवारांनी महिलांना घेऊन घरोघरी प्रचार फेरी काढली.यावेळी जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती रसिका पाटील उपस्थित होत्या.
आज खुपीरे , पाडळी खुर्द, दोनवडे, वाकरे, खुपीरे या गावासह परिसरात प्रचार फेरी झाली.