कुंभी कासारी साखर कारखाना निवडणुकीसाठी राजश्री शाहू, कुंभी बचाव आघाडीच्या पॅनेलची घोषणा
विरोधी पॅनेल केले जाहीर
कोल्हापूर :
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विरोधी राजश्री शाहू कुंभी बचाव आघाडीने पॅनेलची घोषणा शनिवारी केली. या आघाडीचे प्रमुख बाळासाहेब खाडे यांनी आघाडी मधील उमेदवारांची नावे आज जाहीर केली.यामुळे आता बिनविरोधची चर्चा संपली असून पारंपरिक शाहू आघाडी विरुद्ध नरके गट अशी दुरंगी लढत निश्चित झाली आहे.
आज शाहू आघाडीचे वतीने जाहीर केलेली उमेदवारांची नावे अशी…..
गट क्रमांक एक मधून एकनाथ चित्राप्पा पाटील कुडित्रे ,युवराज कृष्णात पाटील कोपार्डे, शिवाजी तुकाराम तोडकर वाकरे,
गट क्रमांक दोन
मधून बाजीराव नानू खाडे सांगरूळ ,राजेंद्र गुंडाप्पा सूर्यवंशी कसबा बीड, बुद्धीराज शंकर पाटील महे, परशुराम राजाराम पाटील बहिरेश्वर, सरदार शिवाजी पाटील शिरोली दुमाला ,
गट क्रमांक तीन
सर्जेराव ज्योती पाटील खुपिरे, आनंदा कृष्णात पाटील खुपिरे ,बाजीराव दौलू पाटील कोगे,
गट क्रमांक चार
शशिकांत आडनाईक यवलुज ,स्नेदीप पाटील कसबा ठाणे, सरदार बाडे पुनाळ ,
गट क्रमांक पाच
प्रकाश देसाई देसाईवाडी, नानासो पाटील पाट पन्हाळा, विलास बोगरे सुळे, आनंदा चौगुले हरपवडे,
महिला राखीव प्रतिनिधी
स्नेहल उत्तम पाटील शिंगणापूर ,राजश्री सुभाष पाटील वाकरे ,
इतर मागासवर्गीय विकास पाटील कोलोली,
भटक्या विमुक्त जाती व जमाती बाबुराव भाऊसो रानगे सावरवाडी ,
अनुसूचित जाती जमाती हिंदुराव श्रावणा कांबळे हिरवडे दुमाला.
यावेळी संभाजी ज्ञानू पाटील, एस के पाटील ,प्रा टि एल पाटील, दादू कामीरे, एम एम पाटील, शंकराव पाटील, पैलवान संभाजीराव पाटील, राजूबाबा खानविलकर, शंकरराव पाटील, अमर पाटील ,जयसिंगराव हिरडेकर, आनंदराव पाटील, बी आर पाटील, सत्यजित पाटील, चेतन पाटील, रणजीत पाटील, विजय भोसले,
उपस्थित होते.