शिरोली दुमाला येथे २८ ते २९ जानेवारीला श्री.साई पादुका दर्शन सोहळा
कोल्हापूर:ता.२४
श्री.विश्वास नारायण पाटील फौंडेशनच्या वतीने श्री.साई पादुका दर्शन सोहळा या धार्मिक उपक्रमाचे संयोजन करण्यात आले आहे. श्री साईबाबांच्या पादुकांचे शनिवारी शिरोली दु. ता.करवीर येथे सकाळी नऊ वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर मिरवणुकीने या पादुका श्री.विश्वास नारायण पाटील यांच्या घरी ठेवण्यात येतील. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व साई भक्त उपस्थित असतील.
श्री साईबाबांच्या पादुका (साईबाबांनी नानासाहेब निमोणकर निमोण शिर्डी यांना दिलेल्या) शिरोली दु.येथे येणार आहेत.त्याचबरोबर श्री.साई बाबांची ९ नाणी(साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदे-शिर्डी यांना दिलेली) व साईबाबांची कफनी(म्हाळसापती-शिर्डी)हि दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. भाविकांना शनिवार व रविवार (दि. २८ व २९) या पादुकांचे दर्शन घेता येईल, अशी माहिती विश्वास नारायण पाटील फौंडेशन यांच्या वतीने देण्यात आली.
शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाविकांना या पादुकादर्शनाचा लाभ घेता येईल. तसेच त्या दिवशी पारायण व विविध धार्मिक आयोजित करण्यात आले आहे. रविवार दि.२९ जानेवारी २०२३ इ.रोजी महाआरती व महाप्रसाद सायंकाळी ठिक ७.०० वाजता होणार आहे.तरी भागातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घावा असे आवाहन करण्यात आले आहे.