जिल्ह्यात ४१३६ शेतजमीन मोजणी प्रकरणे प्रलंबित

या हंगामात मोजणी पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची मागणी

कोल्हापूर :

जिल्ह्यात ४१३६ शेतजमीन मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत.
सध्या सर्वत्र ऊस तोडणी हंगाम जोमात सुरू आहे. उसाचे क्षेत्र असणाऱ्या शेतजमिनी रिकाम्या होत आहेत, यामुळे प्रलंबित शेतजमीन मोजणी पूर्ण कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे.

कोविड मुळे गेली दोन वर्ष शेतजमिनी मोजणी चे काम प्रलंबित पडले आहे. तसेच यंदा सर्वत्र ऊस तोडणी हंगाम जोमात सुरू आहे, उसाचे क्षेत्र रिकामे होत आहे ,यामुळे प्रलंबित राहिलेल्या शेतजमिनीची मोजणी पूर्ण करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे.

जिल्ह्यात ४१३६ शेतजमीन मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. शासनाकडून, अप्पर सचिव यांचे कडून जिल्ह्यात सप्टेंबर पर्यंतची प्रलंबित प्रकरने मार्चपर्यंत पूर्ण करावीत असे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

जिल्ह्यात एका वर्षावरील सुमारे ६१, सहा महिन्यावरील १०७४ , तीन महिन्यावरील ८४७, दोन महिन्यावरील ६५१,दोन महिन्याच्या आतील ६३१, एक महिन्याच्या आतील ८७२ शेतजमीन मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये करवीर तालुक्यात सर्वाधिक ७५६, व त्या पाठोपाठ पन्हाळा तालुक्यातील ६८० प्रकरने प्रलंबित आहेत. शेतजमिनी मोजणी होत नसल्याने शेतकऱ्यांच्यात वाद विवाद वाढत आहेत. संबंधित खात्याने तातडीने मोजणी करावी अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात शेतजमीन मोजणीसाठी ४६ सर्वेअर पदे मंजूर आहेत, कितीच कर्मचारी कार्यरत आहेत,तर १६ पदे भरतीची बाबत कार्यवाही सुरू आहे. अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली.

तालुका निहाय ३१ मार्च २०२२ रोजी शिल्लक मोजणी प्रकरणे अशी.
करवीर ११३३,हातकणंगले ६४५, शिरोळ ३१२, कागल ५६४,आजरा ३१५, चंदगड ४९९, गडहिंग्लज ५४२,पन्हाळा ६१६,शाहूवाडी ५३३, राधानगरी १५९,भुदरगड २४९, गगनबावडा ८६.

……………….

सुदाम जाधव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर,
वरिष्ठांच्या कडून सप्टेंबर पर्यंतची प्रकरने मार्चपर्यंत संपवण्याचे उद्दिष्ट दिले आहे. वेळप्रसंगी खाजगी यंत्रणा घेण्यास परवानगी दिली आहे. मोजणीचे काम सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!