ईश्वर कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना ऊर्जा मिळाली : आमदार पी. एन. पाटील
कोल्हापूर :
दिनांक १४ व १५ जानेवारी रोजी ईश्वर कृषी प्रदर्शन पार पडले. यामध्ये तांदूळ महोत्सव आयोजित केला . तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाचा लाभ झाला असून ईश्वर कृषी प्रदर्शनामधून शेतकऱ्यांना ऊर्जा मिळाली आहे. ईश्वर फाउंडेशनने त्यांचे कार्य सातत्याने सुरू ठेवावे, असे प्रतिपादन आमदार पी.एन. पाटील यांनी केले.

कृषी प्रदर्शनच्या दुसऱ्या दिवशीच्या सांगता समारोप कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते. यावेळी गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील प्रमुख उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची मुले शेतीकडे वळली पाहिजेत ,रासायनिक खतांचे प्रमाण कमी होऊन सेंद्रिय शेती अमलात आली पाहिजे.
गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले शेतकरी हा राजा आहे. जगाचे पोट भरण्याची काम शेतकरी करतो. मात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत नाही. ईश्वर कृषी प्रदर्शनामधून शेतकऱ्यांना मोलाची माहिती मिळाली आहे.
यावेळी प्रास्ताविकात अध्यक्ष नितीन जंगम यांनी, यापुढे मोफत माती परीक्षण केंद्र सुरू करणार असल्याचे सांगितले, तसेच शेतकऱ्यांसाठी सुसज्जअसे ग्रंथालय व या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुस्तके ठेवणार असून भविष्यात शेतकऱ्यांवर पैसा खर्च करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
आज तांदळाच्या प्रसिद्ध वरायटी आर जे इंद्रायणी सुवासिक, अवनी तांदूळ, प्रसिद्ध वाडा कोलम तांदूळ, सुवासिक मधुमती तांदूळ ,अक्षत तांदूळ पहायला मिळला, नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तांदूळ व शेतीशी निगडित साहित्यांची खरेदी केली.
यावेळी कृषी विद्यावेत्ता डॉक्टर अशोक पिसाळ यांनी ऊस उत्पादकता वाढ याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी विठ्ठल पाटील यांचे मनोगत झाले. गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, माजी सभापती पंचायत समिती अनिता जंगम, उपस्थित होते. यावेळी सारिका पाटील ,उत्तम ढेंगे, रामचंद्र पाटील रामचंद्र गणपती पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.प्रा. टी एस जंगम यांनी आभार मानले.
ईश्वर कृषी भूषण पुरस्कार 2023…..
मसाजी नरके, गणेश वाडी, पॉलिहाऊस मध्ये गुलाम व मोगरा पीक,
प्रताप चिपळूणकर ,नागदेववाडी आधुनिक पद्धतीने ऊस पिक,
नारायणराव जाधव ,पाडळी खुर्द, ऊस पिक, उद्योजक,
अजित चौगले ,दोनवडे विविध पिके,
विठ्ठल पाटील महे, आधुनिक शेती,
महादेव माळी ,कुडित्रे ऊस शेती ,विजय पाटील शिंदेवाडी ,आधुनिक शेती ,बाबुराव कारंडे सावरवाडी फुल पिके, रणजीत पाटील कसबा बीड ,सागर पाटील कोपार्डे ऊस पिक, अशोक पाटील कोदे कलिंगड ,अशोक किरुळकर वेतवडे ऊस पिक ,सचिन पाटील खुपिरे भाजीपाला, पांडुरंग दिवसे फुलेवाडी ऊस पिक, भीमराव पाटील साबळेवाडी भाजी पिके, कृष्णात माने बहिरेश्वर फुल पिके, वैभव पाटील वाकरे फुल पीक, बाजीराव कासोटे सांगरुळ आधुनिक शेती.
यावेळी स्टॉलमध्ये शिल्पा कळंत्रे वाडाकुलम तांदूळ, तानाजी मोरे व मोरे कुटुंब तांदूळ व तीळ , भिकाजी सुलताने गुळ काकवी, पायगोंडा शिराणे चिकू, शांतिनाथ पाटील नारळ, विश्वास पाटील गावरान काकडी ,विजय पाटील मका, नारायण पांडव देशी केळी, या शेतकऱ्यांनी भाग घेतला.