चला कृषी प्रदर्शन पाहायला :
बालिंगा येथे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
करवीर :

बालिंगा येथे दोन दिवस चालणाऱ्या ईश्वर फाउंडेशनच्या वतीने ईश्वर कृषी प्रदर्शनचे उद्घाटन आमदार जयंत आसगावकर यांचे हस्ते झाले. यावेळी ईश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन जंगम, आय एस जंगम, तालुका कृषी अधिकारी सुनील रुपनर, टी एस जंगम, बंडा कुंभार, संजय पाटील,शेतकरी तानाजी मोरे उपस्थित होते. हे कृषी प्रदर्शन शनिवार रविवारी दोन दिवस भरविण्यात येणार आहे, शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन नितीन जंगम व प्राध्यापक टी एस जंगम यांनी दिली.

आमदार जयंत आसगावकर म्हणाले, शहर सोडून तालुकास्तरावर ईश्वर फाऊंडेशनने कृषी प्रदर्शन भरवले या फाउंडेशनचे कौतुक आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला कृषी उत्पादने, प्रदर्शन मध्ये ठेवण्याची संधी शेतकऱ्यांना दिली आहे. शेतकऱ्यांना एक व्यासपीठ आहे ,सेंद्रिय गुळ सेंद्रिय भाजीपाला विक्रीला स्टॉलवर ठेवला आहे.
प्रास्ताविकात नितीन जंगम म्हणाले शेतकऱ्यांना शेती करताना अनेक प्रश्न निर्माण होतात, यावर मार्गदर्शन मिळावे व शेतकऱ्यांची उत्पादन वाढावे यासाठी ईश्वर फाउंडेशन च्या वतीने बालिंगा येथे दोन दिवसाचे कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे .यामध्ये जागतिक दर्जाच्या संशोधनातून उत्पादित केलेली उत्पादने तणनाशके, कीटकनाशके ,बीबीयाने ,खते, शेती अवजारे याचे स्टॉल मानण्यात येणार आहेत. फळे भाजीपाला फुले ऊस गुळ तांदूळ महोत्सव भरवण्यात येणार आहे.
तसेच यावेळी शेतकऱ्यांना हुमणी नियंत्रण,व ऊस पिक मार्गदर्शन चर्चासत्र ठेवण्यात आले आहे. तसेच १८ शेतकऱ्यांना ईश्वर कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. शनिवार १४ व रविवार १५ रोजी या कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी आवाहन केले आहे.