कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची उद्या ६ तारखेपासून अर्ज भरण्यास सुरुवात,१२ फेब्रुवारी रोजी मतदान, मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी मतमोजणी निकाल
कोल्हापूर :
कुडीत्रे ता.करवीर येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीची शुक्रवार दि.६ पासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. रविवार दि.१२ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर मंगळवार दि.१४ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
गेले दोन वर्ष कोरोना मुळे वनिवडणुकीला मुदतवाढ मिळाली होती.
शुक्रवार दि.६ ते गुरुवार दि. १२ जानेवारीअखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. अर्जाची छाननी शुक्रवार दि.१३ रोजी होणार आहे.सोमवार दि. १६ ते सोमवार दि. ३० जानेवारीअखेर उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. निवडणुकीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप मंगळवार दि.३१ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.त्यानंतर १ फेब्रुवारी पासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे.
रविवार दि.१२ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर मंगळवार दि.१४ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
२००४ सालापासून कारखान्यावर माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नरके गटाची सत्ता आहे. या निवडणुकीसाठी विरोधक राजर्षी शाहू आघाडीत एकजूट झाली आहे,याबाबत बैठका झाल्या आहेत.यामध्ये राजर्षी शाहू आघाडी, यशवंत मंच,शेतकरी संघटना आणि कुंभी कासारी बचाव मंच हे सर्व गट एकत्र आले आहेत.