कृष्णात माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास प्रतिसाद
करवीर :
गणेशवाडी (ता. करवीर) येथील कृष्णात बाबुराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत आयोजित रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. शिबिरात ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून माने यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके, वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे, बुद्धिराज पाटील, रानोजी माने, माजी पं.स.सदस्य सुनील पाटील, रयत संघाचे संचालक सचिन पाटील, मुकुंद पाटील, नामदेव एकल, तानाजी माने, प्रकाश माने, अभिषेक पाटील, प्रदीप माने आदीसह युवक, ग्रामस्थ उपस्थित होते.