कांचनवाडी ग्रामस्थ एकवटले : शाळेचे रुपडे पालटणार : ६ लाख रुपयेची वर्गणी जमा

कोल्हापूर :

करवीर तालुक्याच्या पश्चिम टोकाला तुळशी नदीच्या काठी उंच टेकडीवर वसलेल्या कांचनवाडी गावच्या जिल्हा परिषद शाळेचे रुप पालटणार आहे. शाळेच्या सुशोभीकरणासाठी ग्रामस्थ एकवटे असून लोकसभागातून सहा लाख रुपये ची वर्गणी जमा केली आहे .

विद्या मंदिर कांचनवाडी या शाळेची स्थापना १९४६ साली झाली. पूर्वी हनुमान मंदिरात भरणाऱ्या शाळेची इमारत महादेव माळावर दोन खोल्या बांधून सुरू करण्यात आली.

कालांतराने १९७२ साली सध्याची शाळा इमारत लोकसहभाग व वर्गणीतून उभारण्यात आली. १ ते ७ वी पर्यंत शाळेच्या इमारतीचे ७ वर्ग खोल्या आहेत. पूर्ण दगडी बांधकाम असून छप्पराचे रुपकाम जीर्ण झाले असून केरळच्या धर्तीवर शाळेच्या इमारतीची रचना करण्याचा आराखडा बनवला आहे.

शिक्षकवेतनेत्तर अनुदान बंद झाल्यानंतर शाळेच्या डौलदार इमारतीला दुरुस्तीचे ग्रहण लागले. शाळेच्या स्वच्छतागृहाची वाताहत झाली. वीज, पिण्याच्या पाण्याबरोबर बाग- बगीचेचा ठावठिकाणा उरला नाही. केवळ गुणवत्तेच्या गप्पा न मारता भौगोलिक सुख सुविधा न झाल्यास विद्यार्थी व शिक्षकांची मानसिकता टिकणार नाही. या विचारातून ग्रामस्थ एकवटले. लोकवर्गणीतून शाळेसाठी मोठा निधी जमा केला जात आहे.

शाळेचा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी अंदमान येथील अर्किटेक्चर अनिश सदाशिवन यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कमी खर्चात शाळेच्या सुशोभीकरणास लवकरच सुरवात केली जाणार असून त्यासाठी १० लाख रुपये निधी लागणार असल्याची माहिती शाळा सुशोभीकरण समिती कडून सांगण्यात आली.

शाळेला रोल माँडेल करणार

शाळेचा विकास आराखडा बनवून जिल्ह्यातील आदर्श शाळा बनविण्याचा संकल्प आहे. शाळेचे अंतरंग आणि बहिरंगात ई लर्निंगसह विविध नवोपक्रम राबवून उत्कृष्ट गुणवत्ता वाढीसाठी प्राधान्यक्रम असेल.
डॉ. सर्जेराव पाटील (अध्यक्ष,शाळा सुशोभीकरण समिती )

शाळेसाठी आम्ही एकसंध..

गावगाडा चालवताना केवळ विधायक भावनेतून आम्ही सर्व ग्रामस्थ शाळेच्या विकासासाठी एकवटलो असून आर्थिक मदतीचा ओघ वाढत आहे. उत्स्फूर्तपणे लोक शाळा सुशोभीकरणात सहभागी होत आहेत.
विष्णुपंत भोसले व तानाजी तानुगडे (खजिनदार, शाळा सुशोभीकारण समिती)

शाळेच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध..
ज्ञानदानाच्या मंदिराची आदर्शवत इमारत उभारणीसाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकवटलो असून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. यासाठी शासकीय निधी खेचून आणण्याचा प्रयत्न केला जाईल
तानाजी दळवी ( उद्योजक )

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!