‘ कुंभी – कासारी ‘ गळीत हंगाम २०२२-२३ ची एफ.आर.पी.एकरकमी प्रतिटन रुपये ३,१००
कोल्हापूर :
कुडित्रे येथील कुंभी – कासारी सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगाम २०२२-२३ ची एफआरपी एकरकमी प्रतिटन रुपये ३,१०० / – प्रमाणे देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली .
हंगाम २०२१-२०२२ करिता प्रतिटन रुपये ३,०४५ / – प्रमाणे संपूर्ण एफ.आर.पी.ची रक्कम एकरकमी ऊस पुरवठादारांना आदा केली असून , तोडणी वाहतूकीची संपूर्ण देणी आदा केलेली आहेत . गळीत हंगाम २०२२-२३ करिता कारखाना गळीतासाठी सज्ज असून कारखान्याने सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणा केलेली आहे . या गळीत हंगामाकरिता कारखान्याने सात लाख मे.टन गळीताचे उदिष्ट ठेवले असून इतर उपपदार्थ प्रकल्पही तात्काळ सुरु करीत आहोत . आजअखेर ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर दिलेला आहे . सध्या गाळप हंगाम २०२२-२३ सुरु करीत आहोत .
यावर्षीही एकरकमी एफ.आर.पी. देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे . तरी सर्व ऊस पुरवठाधारक शेतकरी , सर्व ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार , सर्व कर्मचारी , हितचितंक यांनी आपला संपूर्ण पिकवलेला ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे अशी विनंती कारखाना संचालक मंडळाव्दारे करण्यात आली . यावेळी व्हा . चेअरमन निवास वातकर , सर्व संचालक मंडळ सदस्य , कार्यकारी संचालक धिरजकुमार माने उपस्थित होते .