गणेशवाडीतील विक्रम नरकेचे कौतुक

करवीर :

करवीर तालुक्यातील
गणेशवाडी येथील विक्रम दिलीप नरके या युवकाकडून प्रामाणिक, पणाचे, सच्चेपणाचे दर्शन घडले. त्याने बीडशेड ते गणेशवाडी मार्गावरील स्मशानशेडजवळील रस्त्यावर दहा हजार रुपये नोटांचा विस्कटून पडलेला बंडल गोळा करून प्रामाणिकपणे परत केला. धोंडेवाडी येथील सरपंच पांडुरंग नलवडे यांचे पैसे परत मिळाल्याने त्यांनी विक्रमचे मनापासून आभार मानले. विक्रमच्या या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक होऊ लागले आहे.

मंगळवारी विक्रम हा बीडशेड येथील श्रीपतरावदादा बँकेत पैसे काढण्यासाठी गेला होता. पॅनकार्ड विसरले म्हणून तो पुन्हा गणेशवाडी येथे घरी येऊन परत बीडशेडकडे मोटारसायकलवरून चालला होता. दरम्यान वाटेत असलेल्या स्मशानशेडजवळील रस्त्यावर पैशाचा बंडल व काही नोटा विस्कटून पडलेल्या त्याला दिसल्या. गाडी थांबवून त्याने ते सर्व पैसे मोजून एकत्र केले व बीडशेड येथे एका संबंधित दुकानदाराकडे ठेवले आणि कोणी पैशाची चौकशी करायला येईल त्याला ते परत करू असे सांगितले. पुढे तो बँकेत गेला आणि तेथेही बँकेतून कोण पैसे काढून गेला असेल आणि तो पडलेत किंवा हरवलेत म्हणून सांगू लागला तर जरूर कळवा असे सांगितले.

योगायोगाने त्याच बँकेतून एक अर्ध्या तासाच्या फरकाने अगोदर धोंडेवाडीचे सरपंच पांडुरंग नलवडे यांनी पैसे काढले होते आणि त्यांनी बीडशेड येथे आपल्या मुलाकडे पैसे देऊन त्याला घरी पाठवले होते. मोटारसायकलवरून नलवडे यांचा मुलगा धोंडेवाडीकडे जात असताना खिशातील हातरुमाल किंवा मास्क बाहेर काढण्याच्या नादात वाटेत पैसे कधी पडले जे त्याला कळले नाही. नंतर ही बाब लक्षात येताच पैशाची शोधाशोध सुरू झाली. अखेर विक्रमशी संपर्क आल्यावर पैशाची खातरजमा करून नलवडे यांना त्यांचे पैसे मिळाले. विक्रमने दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!