विजेच्या फ्युज पेटीत मध्ये अडकला बॉल
महावितरण चा मुलांच्या जीवाशी खेळ
करवीर :
आमशी ता. करवीर येथे महावितरण कंपनीचा नागरिकांच्या व मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. गेल्या काही दिवसापूर्वी परिसरात डीपीवर शॉक लागून एका वायरमनचा मृत्यू झाला होता, हे प्रकरण ताजे असताना आज डीपी च्या फ्युज पेटीत मध्ये मुलग्याचा बॉल अडकला, आणि एक मुलगा आणि मुलगी काठीने तो बॉल काढण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकाराबद्दल पालक, नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बोलोली येथे गेल्या काही दिवसापूर्वी डीपी वर काम करत असताना एका वायरमनचा भाजून मृत्यू झाला होता, हे प्रकरण ताजे असताना परिसरात अनेक फ्युज पेट्यांना दरवाजे नसल्याचे समोर आले आहे. आज आमशी येथे प्राथमिक शाळेच्या आवारात हा डीपी आहे ,या डीपीच्या ठिकाणी खाली जमिनीवरून चार फुटावर फ्युज पेटी आहे फ्युज पेटीला दरवाजा नाही, जवळच चार कुटुंब राहतात, तसेच पहिली ते चौथी मराठी शाळा या ठिकाणी आहे ,हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात, तसेच जवळच स्मशान भूमी आहे, आणि घुने धुण्यासाठी महिलांची परिसरात ये जा असते, अशा वर्दळीच्या ठिकाणी या हा डीपी असून फ्युज पेटीला दरवाजा नाही.
आज जवळच राहणाऱ्या एका कुटुंबातील दोन मुले या ठिकाणी खेळत होती. आणि खेळताना बॉल फ्युज पेटीत अडकला,यावेळी काठीचे साह्याने ही मुले बॉल काढताना नागरिकांनी पाहिले, यावेळी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला, तसेच हा फोटो सर्वत्र व्हायरस झाल्यानंतर परिसरातून नागरिकांच्यातून संताप व्यक्त होत होता. दरम्यान महावितरण ने तातडीने सर्वच फ्युज पेट्यांना दरवाजे बसवावे अशी मागणी होत आहे. दरम्यान सरपंच पल्लवी पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून दरवाजे करावे ,असे दोन वेळा लेखी निवेदन देऊनही दखल घेतली नाही असे सांगितले.
………………
पद्मा अशोक पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आमशी,
फ्युज पेटीला दरवाजे नाहीत, पहिली ते चौथीची शाळा या ठिकाणी आहे ,मुलांच्या जीवाला धोका आहे, महावितरण ने तातडीने पेटीला दरवाजे करावे.