प्रामाणिकपणा : दहा तोळे सोने केले परत ;
जगात भारी आम्ही कोल्हापूरी
कोल्हापूर :
कोल्हापूरचे लोक संस्कृती आणि पमाणिकपणा जपणारे आहेत.याचाच प्रत्यय आजही येतो.एका पती पत्नीने रस्त्यावर सापडले दहा तोळे सोने त्या कुटुंबाला प्रामाणिकपणे परत केले आहे.यामुळे जगात भारी आम्ही कोल्हापूरी असेच म्हणावे लागेल.
तानाजी देसाई रा, जिवबा नाना पार्क सेवानिवृत्त शिक्षक हे आपल्या घरातील दहा तोळे सोने बँकेत ठेवण्याकरता दुपारी १२:३० वाजता जिवबा नाना पाक ते वाशी असे जात असताना त्यांच्या टू व्हीलर मोटरसायकलच्या डिकीतून सोन असलेली पिशवी रस्त्यात पडली .
ही पिशवी विजय मोरे व त्यांच्या पत्नी हर्षदा मोरे यांना रस्त्यात मिळून आली, त्यांनी ही पिशवी करवीर पोलीस स्टेशनला आणून,दिली,व पुढे तानाजी देसाई यांना दिली आहे.त्या बदल मोरे दाम्पत्याचे प्रामाणिकतेचे कौतुक होत आहे.