आरोग्य विभागाच्या शोध अभियानात निष्पन्न
करवीर तालुक्यात सर्वाधिक कुष्ठरोगाचे २१ रुग्ण तर हातकणंगले तालुक्यात क्षयरोगाचे ४५ रुग्ण
कोल्हापूर :
जिल्ह्यात जिल्हा परिषद, आरोग्य विभागाचे वतीने सक्रीय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात आले, यामध्ये क्षयरुग्ण २२२ तर कुष्ठरुग्ण ६४ सापडून आले ,आरोग्य विभागाच्या शोध अभियानात ही आकडेवारी निष्पन्न झाली आहे. यामध्ये करवीर तालुक्यात सर्वाधिक कुष्ठरोगाचे २१ रुग्ण तर हातकणंगले तालुक्यात क्षयरोगाचे ४५ रुग्ण सापडले असून, कुष्ठरुग्ण असणारे अनेक रुग्ण, होणा-या त्रासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे व आजाराबाबत डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असल्याचे आढळले असून अजूनही या आजाराबाबत गैरसमज आहेत असे चित्र आहे.
जिल्ह्यात शासनाच्या निकषानुसार
१३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत सक्रीय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात आले. क्षयरोगाचे व कुष्ठरोगाचे निदान होण्यापासून अदयापही वंचित असणा-या सर्व क्षयरुग्णांचा व कुष्ठरुग्णांचा प्रत्यक्ष शोध घेऊन त्यांना औषधोपचारावर आणणे हा या मोहीमेचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे केंद्रशासनातर्फे ही प्रत्यक्ष क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्याचे ठरविले होते.
या मोहिमेत १२ तालुक्यांतर्गत जिल्ह्यातील ३१ लाख २९ हजार ३२९ लोकसंख्या निवडलेली होती , यामध्ये एकूण १४ हजार ६०९ इतक्या संशियीत रुग्णांची टी.बी.साठी तपासणी केली यामधून २२२ क्षयरुग्ण सापडले आहेत.
आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक सेविका ,आशा यांनी, प्रत्यक्ष जाऊन घरोघरी भेट देऊन रुग्णांची मोफत तपासणी केली, यामध्ये आरोग्य विभागाने अथक परिश्रम घेतले . यामध्ये ५०६८ इतके कर्मचारी यांनी काम केले . शासनाकडून निदान झाल्यास उपचार मोफत दिला जात आहे. अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी.कुंभार यांनी दिली.
टीबी साठी दोन आठवडयांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, ताप, छातीत दुखणे, वजनात लक्षणीय घट, अशा रुग्णांची मोफत तपासणी केली व कुष्ठरोग लक्षणे साठी बधीर चट्टा,कानाच्या पाळया जाड होणे,भुवया विरळ होणे. असे लक्षणे असणारे रुग्णांची मोहीम कालावधीमध्ये आरोग्य कर्मचा-यांनी तपासली केली. आरोग्य विभागाकडून
दरमहा ५०० रुपये पोषण आहारसाठी क्षयरुग्णांना औषधे संपेपर्यत दिली जातात.यासाठी माइकिंग,पोस्टर, बॅनर, माहिती पत्रके, पथनाटय,इत्यादी मोहीमेच्या जनजागरण करण्यात आले.
…………………
डॉ.योगेश साळी, जिल्हा आरोग्य अधिकारी, या सर्वे मध्ये जास्त रुग्ण सापडले, पण पुढे धोका टाळण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांना शोधणे हे उद्दिष्ट होते, त्यामुळे पुढचा धोका कमी होईल.
क्षयरोगाबाबत घ्यावयाची काळजी……
दोन आठवडे पेक्षा जास्त दिवस खोकला राहिल्यास बेडका तपासावा,
.पौष्टिक आहार घ्यावा, औषध उपचार रुग्ण पूर्ण बरा होई पर्यंत घ्यावा, वेळेत उपचार घ्यावा, पूर्ण उपचार करून घ्यावा, यामुळे शंभर टक्के रुग्ण बरा होतो,
.क्षय रोगाचे लक्षणे आढळून आल्यास वेळेत तपासणी करून घ्यावी,
.क्षयरोग बाधित व्यक्तीला लहान मुलांपासून स्वतंत्र ठेवावे व स्वतंत्र खोली द्यावी,
.त्या रुग्णाने खोकताना,व शिंकताना तोंडावर रुमाल धरावा,