यशवंत बँकेच्या वतीने १६ ऑक्टोबर रोजी
मोफत आरोग्य शिबिर :
अध्यक्ष एकनाथ पाटील
कुडित्रे ता.१३
श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित , कुडित्रे ( कुंभी – कासारी ) यांच्या वतीने बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त १६ ऑक्टोबर रोजी एम डी मेडिसिन, डी . एम . कॉर्डीयालॉजी डॉ. अर्जुन आडनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबीर,व मोफत हृदय रोग चिकित्सा व निदान शिबीराचे आयोजन केले आहे.अशी माहिती यशवंत बँक अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिली.
यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले
रविवार १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत शिबिराचे आयोजन केले असून, शिबीरा मध्ये रक्तामधील साखर, व एच बी ची मोफत तपासणी , हृदय रोग तज्ञ डॉक्टरांव्दारे चिकित्सा व मार्गदर्शन , शिबीरानंतर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे, यावेळी मोफत ई . सी . जी . इको टी . एम . टी . अँजिओग्राफी , शिबीरातील रुग्णांची शस्त्रक्रिया योग्य योजनेअंतर्गत स्वस्तिक हॉस्पिटल येथे मोफत केली जाणार आहे . खालील लक्षणे असणाऱ्यांनी शिबीराचा लाभ घ्यावा . छातीत धडधडणे ,चालताना धाप लागणे ,वेळी अवेळी दरदरून घाम येणे , छातीत दुखुन डाव्या हातात कळा येणे, अचानक येणारी छतीतील डाव्या बाजूला कळ व पाठदुखी,उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे.
कुडित्रे शेतकरी सांस्कृतिक कार्यालय , कारखाना साईट येथे ठिकाण असून माहितीसाठी श्री यशवंत सहकारी बँक कुडित्रे येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर ,संचालक सर्जेराव पाटील, नामदेव मोळे, प्रकाश देसाई, बाजीराव खाडे, दादा पाटील ,सुभाष पाटील, सर्व संचालक उपस्थित होते.