महिलांच्या खेळांना राज्यस्तरीय मान्यतेची मागणी करणार : चंद्रदीप नरके
राजेंद्र दिवसे मंचतर्फे झिम्मा – फुगडी स्पर्धा
करवीर :
महिलांना प्रतिष्ठा आणि मानसन्मान देणाऱ्या पारंपरिक खेळांना गोविंदा प्रमाणे शासकीय मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू असे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले . अर्चना चॅरिटेबल ट्रस्ट व राजेंद्र दिवसे युवा मंच नागदेववाडी यांच्यावतीने महिलांसाठी आयोजित झिम्मा – फुगडी स्पर्धा व कुंकुमार्चन कार्यक्रमात ते बोलत होते .
यावेळी नरके म्हणाले,
महिलांसाठी झिम्मा – फुगडी स्पर्धा व कुंकुमार्चन उपक्रम घेणे राजेंद्र दिवसे यांचे सामाजिक कार्य आहे.
गोकुळ’चे संचालक अजित नरके यांची प्रमुख उपस्थिती होती . राजेंद्र दिवसे यांनी स्वागत करून,अर्चना चॅरिटेबल ट्रस्ट चा माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करणे हाच आमचा अजेंडा आहे,कारण महिलांचे सक्षमीकरण हेच देशाचे उज्ज्वल भविष्य असल्याचे मत व्यक्त केले.
तर प्रियांका दिवसे यांनी आभार मानले . बाजार समिती संचालक संजय जाधव , व्ही . जी पाटील , कुडित्रे सरपंच ज्योत्स्ना पाटील , नागदेववाडी सरपंच बाळासाहेब दिवसे , धनाजी पाटील , सागर जामदार , शिवाजी मोहिते , रवी पाटील उपस्थित होते .