गोकुळच्‍या झिम्‍मा स्पर्धा : राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वरची गणेश दूध संस्‍थेचा प्रथम क्रमांक

कोल्‍हापूर: (ता.०८)

गोकुळने आयोजित केलेल्‍या झिम्‍मा,फुगडी, चुईफुई, घागर घुमवणे, अशा पारंपारिक खेळांच्‍या स्‍पर्धाचा बक्षीस वितरण कार्यक्रम गोकुळच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात सन्मानीय सौ.शांतादेवी डी.पाटील (आईसाहेब) यांच्या प्रमुख उपस्थित तसेच संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील व इतर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाला. या स्‍पर्धासाठी जिल्‍ह्यातून हजारो महिला उपस्थित होत्‍या. यावेळी बोलताना चेअरमन श्री.पाटील म्हणाले गोकुळने महिला सबलीकरणाचे काम अत्‍यंत चांगल्‍या प्रकारे केले असल्‍याने त्‍यांच्‍या कलागुणांना वावदेणे हे आपले कर्तव्‍य समजून गोकुळमार्फत अशा स्‍पर्धाचे आयोजन केले जाते. स्‍पर्धेनंतर विजेत्‍यांना याच ठिकाणी बक्षीस वितरण करण्‍यात आले. विजेत्‍यांना खालीलप्रमाणे जवळजवळ १लाख २५ हजार रूपये रोख रक्‍कमेसह प्रशस्‍तीपत्रे व स्‍मृतिचिन्‍हे देण्‍यात आली तसेच चुईफुई स्पर्धेतील सर्वात लहान स्पर्धक निवाचीवाडी येथील समिक्षा सूर्यवंशी, गौरी सूर्यवंशी यांना चेअरमन विश्‍वास पाटील यांनी बक्षीस दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी केले. स्‍पर्धेचा निकाल व बक्षीस रक्‍कम खालीलप्रमाणे :

————=======————–

झिम्‍मा स्‍पर्धा निकाल

क्रमांक –बक्षीस रक्‍कम–विजेते

पहिला : १५,०००/-
गणेश दूध संस्था कपिलेश्वर ता. राधानगरी

दुसरा: १४,०००/-
शाहू छत्रपती दूध संस्था शिरोली दु.ता.करवीर

तिसरा : १३,०००/-
सुवर्णा दूध संस्था माजनाळ ता.पन्हाळा

चौथा : १२,०००/-
शा.गो.पाटील दूध संस्था पंडेवाडी ता.राधानगरी

पाचवा: ११,०००/-
हनुमान दूध संस्था घोटवडे ता.राधानगरी

उत्तेजनार्थ -१ : १०,०००/-
महालक्ष्मी दूध संस्था व्हनूर ता.कागल

उत्तेजनार्थ – २ : १०,०००/-
श्री.कृष्ण दूध संस्था बहिरेश्वर ता.करवीर

फुगडी स्‍पर्धा निकाल

क्रमांक –बक्षीस रक्‍कम –विजेते

पहिला : ३,०००/-
सौ.लता खापणे(कोतोली पैकी माळवाडी )
सौ.अर्चना गायकवाड (कोतोली पैकी माळवाडी )

दुसरा : २,८००/-
सौ.दिपाली दिंडे (बहिरेश्वर)
सौ.संगीता दिंडे (बहिरेश्वर)

तिसरा : २,६००/-
सौ.शितल शिपेकर(शिपेकरवाडी)
सौ.शोभा बाटे (शिपेकरवाडी)

चौथा: २,५००/-
सौ.भारती कुंभार (शिरोली दु)
सौ.सरिता पाटील (शिरोली दु.)

पाचवा : २,४००/-
सौ.गायत्री पाटील (जठारवाडी)
सौ.पूजा चव्हाण (जठारवाडी)

चुईफुई स्‍पर्धा

क्रमांक –बक्षीस रक्‍कम–विजेते

पहिला : १,५००/-
सौ.कविता खोत (घुंगुरवाडी)

दुसरा : १,४००/-
सौ.रेखा पाटील (कपिलेश्वर)

तिसरा : १,३००/-
सौ.शारदा बाटे (तेरसवाडी)

चौथा : १,२००/-
सौ.रोहणी रायकर (तेरसवाडी)

पाचवा : १,१००/-
सौ.अलका सूर्यवंशी (निवाचीवाडी)

घागर घुमविणे स्‍पर्धा

क्रमांक–बक्षीस रक्‍कम–विजेते

पहिला : १,५००/-
सौ.मंगल संभाजी करळे (देसाईवाडी)

दुसरा : १,४००/-
सौ.आरती कोळे (चंद्रे)

तिसरा : १,३००/-
सौ.विद्या पवार (माजनाळ )
सौ.अल्का पाटील (पंडेवाडी|)

चौथा : १,२००/-
सौ.अनिता बाटे (शिपेकरवाडी)

पाचवा : १,१००/-
सौ.स्वाती पाटील (कंदलगाव)
————–=======————

या कार्यक्रमप्रसंगी सन्मानीय सौ.शांतादेवी डी.पाटील, गोकूळचे चेअरमन विश्‍वास पाटील, संचालक नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, सौ. उर्मीला विश्वास पाटील, सरिता नंदकुमार ढेंगे, प्रिया पाटील, ऋचा ढेंगे, पल्लवी पाटील, बंदिनी पाटील,ज्योश्ना जामदार,संघाच्या महिला नेतृत्व विकास विभागाच्या महिला अधिकारी निता कामत, सपंदा थोरात, मृण्मयी सातवेकर,मंगला कापसे,छाया बेलेकर तसेच महिला कर्मचारी व स्वयंसेविका उपस्थित होत्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!