प्रश्न प्राथमिक शाळांचा :
कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्या जाणार ?
Tim Global :
राज्यभरात शून्य ते वीस विद्यार्थिसंख्या असलेल्या शाळा किती आहेत याची माहिती शालेय शिक्षण विभागाने मागवली असल्यामुळे कमी पटसंख्येच्या शाळा राज्य शासनाकडून बंद केल्या जाणार असल्याचे पुन्हा संकेत मिळत आहेत. वित्तीय उपाययोजना करण्याअंतर्गत पदभरती बंदीच्या अनुषंगाने विविध विषयांबाबतची माहिती, स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी यांनी शिक्षण आयुक्त, माध्यमिक शिक्षण संचालकांकडून यांचे कडून माहिती मागविली आहे.असे सांगितले जाते.
दरवर्षी ३० सप्टेंबर पटनिश्चिती मागवली जाते,शासनाकडून कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे प्रयत्न पूर्वीही झाले होते. त्या वेळी शिक्षण क्षेत्रातून विरोध,आणि मोठय़ा प्रमाणात टीका झाली, आतातर पत्रातूनच कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
संचमान्यतेनुसार मंजूर शिक्षक, जिल्हानिहाय विद्यार्थिसंख्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मंजूर पदे, भरलेली पदे , रिक्त पदे, अतिरिक्त शिक्षक,अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत कार्यवाही काय केली, शून्य ते वीस विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती आहेत, या शाळा बंद करण्याची विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे, ही माहिती सादर करावी असे सांगण्यात आले आहे.अशी माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.
………………
जिल्ह्यात शिक्षकांची तब्बल ९०० पदे रिक्त आहेत, यामुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला असून भरतीचा प्रश्न एरणीवर आला आहे ,या शाळा टिकल्या पाहिजेत अशा प्रतिक्रिया पालकांच्यातून व्यक्त होत आहेत.
………….
आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद,
तालुक्यांना पत्र व्यवहार केला आहे ,भौगोलिक परिस्थिती अडचणीची असल्यामुळे जवळच्या शाळातही मुले जाऊ शकत नाहीत ,जिल्ह्यात अंदाजे २० शाळा असू शकतात, जिथे सुविधा उपलब्ध नाही.