करवीर तालुक्यात एकाच दिवशी ३५ जनावरांना लंम्पीची लागण
कोल्हापूर :
करवीर तालुक्यात एकाच दिवशी ३५ जनावरांना लंम्पीची लागण झाल्याचा अहवाल पशुवैद्यकीय विभागाने दिला आहे. लंम्पी
चा प्रादुर्भाव झाला असला तरी एक ही जनावर अद्याप तालुक्यात दगावलेल नाही, तसेच शंभर टक्के लसीकरण झाल्याचा दावा पशुवैद्यकीय विभागाने केला आहे.
पशु जनगणनेनुसार तालुक्यात १२९ गावात ४६ हजार,९५४ गाय पशुधन आहे. या सर्व जनावरांना लॅम्पिच लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात लंम्पीचा
प्रादुर्भाव झाला असताना करवीर तालुक्यात अद्याप एकही जनावर सापडली नव्हते, शनिवारी एकाच दिवशी कोल्हापूर शहरात ,कसबा बावडा, रामानंदनगर ,फुलेवाडी लक्ष तीर्थ, शुक्रवार पेठ, अशा परिसरात १८ गायी, तेरा बैलांना लंम्पीची लागण झाली आहे. यामुळे पशुवैद्यकीय विभाग सतर्क झाला असून कोल्हापूर शहर व बाजूच्या पाच किलोमीटर परिघात शहरात ९५१,व सुमारे ३ हजार जनावरांना लसीकरण तातडीने केले असून पशुवैद्यकीय विभाग नियंत्रण ठेवून असल्याचे सांगण्यात आले आहे.
करवीर तालुक्यात सांगवडे येते चार गाईंना लंम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे. अशी तालुक्यात एकूण ३५ जनावरे बाधित झाली आहेत. सांगवडे परिघात सुमारे ३ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान तालुक्यात अद्याप दुधाचे प्रमाण घेतलेले नाही असे माहिती असून शेतकऱ्यांनी लॅम्पिबाबत सतर्कता बाळगावी, जनावरांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.
………..……………
डॉ. आर एन वडगावे ,सहाय्यक आयुक्त, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, शेतकऱ्यांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे, चुकून एखादे जनावर राहिल्यास लसीकरण करावे, लंम्पीची लागण झाल्यास ताबडतोब नजीकच्या दवाखान्यात जावे व औषध उपचार करावा.