भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया पीओच्या एकूण १६७३ जागांवर भरती
Tim Global :
SBI PO Vacancy: स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार पीओच्या एकूण १६७३ जागांवर भरती केली जाणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. यासाठी, उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच २२ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतात.