शेतक-यांनी पोटखराब क्षेत्र अ लागवडीखाली आणण्याचे प्रस्ताव गावकामगार तलाठी किंवा तहसिलदार यांच्याकडे जमा करावेत
कोल्हापूर :
पोटखराब वर्ग अ मधील क्षेत्र जमीन धारकाने लागवडीखाली आणल्यास त्यास लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणी प्रमाणात अतिरिक्त आकारणी करण्यासाठी अनुसरावयाची कार्यपध्दती अनुसरून काढावयाचे अंतिम आदेश पारीत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना प्रदान केले आहेत. तरी अशा शेतक-यांनी आपल्या तालुक्यातील तहसिलदारांशी संपर्क साधून आपल्या गटामधील अशा शेतक-यांनी पोटखराब क्षेत्र अ लागवडीखाली आणण्याचे प्रस्ताव गावकामगार तलाठी किंवा तहसिलदार यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
शेतक-यांच्या गाव नमूना 7 (7/12 यावर पोटखराब रकान्यात ) “वर्ग अ असे लिहलेल्या समोरील रकान्यात असणारी जमीन धारकास कोणत्याही वेळी लागवडीखाली आणता येईल आणि अशाप्रकारे धारकाने जमीन लागवडीखाली आणल्यास त्या प्रकरणी लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे तहसिलदार अतिरिक्त आकारणी करतील.