या गावातील मल्लाची सुवर्ण पदकाला गवसणी
हरियाणा येथे कुस्तीत ५२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक
कोल्हापूर :
हरीयाना येथे पार पडलेल्या नॅशनल कुस्तीस्पर्धेत भामटे येथील मल्ल विवेक कृष्णात धावडे यांने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून , हरियाणा येथे झालेल्या फेडरेशनच्या वतीने कुस्ती स्पर्धेत ५२ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांकाचे सुवर्ण पदक पटकावले. धावडे यांच्या विजयामुळे करवीर तालुक्यासह जिल्ह्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
विवेक हा गावातील हनुमान तालीम येथे कुस्तीचा सराव करत होता ,यानंतर सह्याद्री संकुल बालेवाडी पुणे येथे गेली सात वर्ष कुस्तीचा सराव करत आहे. हरियाणा येथे झालेले नॅशनल फेडरेशन कप, पंधरा वर्षाखालील ५२ किलो गटात कुस्ती स्पर्धेत त्यांने सुवर्णपदक पटकावले. दैनिक सकाळ शी बोलताना विवेक म्हणाला पहिल्या प्रयत्नात दुसरा क्रमांक आला होता, यावेळी जिद्द व चिकाटीने सराव केला, आणि सुवर्णपदक पटकावले. भविष्यात ऑलिम्पिकला खेळण्याची, ऑलम्पिकला सुवर्णपदक मिळवण्याची इच्छा आहे.
आज सायंकाळी भामटे फाटा ते जोतिर्लिंग मंदिर पर्यंत धावडे यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी वडील कृष्णात धावडे ,सरपंच शिवाजी कांबळे, माजी सरपंच सुरसेन पाटील ,विलास पाटील, वस्ताद सरदार पाटील ,ग्रामपंचायत सर्व आजी माजी पदाधिकारी ,हनुमान तालमीचे मल्ल कार्यकर्ते व ग्रामस्त सर्व तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.