शिक्षणासाठी : दररोज ८० विद्यार्थ्यांना १० किलोमीटर चालावे लागते
अणुस्कुरा :
रंकाळा चौकेवाडी ही सायंकाळी ५ वाजता जाणारी एसटी बंद झाल्याने कासारी खोऱ्यातील सुमारे ८० विद्यार्थ्यांना दहा किलोमीटर चालत घरी जावे लागत आहे .
चालून चालून विद्यार्थी आजारी पडत आहेत,यामुळे मुले शिक्षण बंद करतील असे चित्र निर्माण झाले आहे.धो धो धो पाऊस पाऊस आणि सायंकाळी लवकर पडणारा अंधार यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

संध्याकाळी पाच वाजता अनुस्कुरा येथे पोहोचणारी रंकाळा चौकेवाडी एसटी करंजफेन ( ता . शाहूवाडी ) इथूनच परत जात असल्याने पास काढून सुद्धा विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे .
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेच्या विद्यार्थिनी तसेच मासिक पास काढलेल्या मुलांना याचा काहीच उपयोग होत नाही , त्यामुळे मुलांना घरी पोहोचण्यासाठी सायंकाळी सात वाजतात . पायी चालण्याचा त्रास होत आहे, शाळा सुटल्यानंतर अणुस्कुरा येथे एसटीची वाट पाहत असलेने बाल चिमुकले विद्यार्थी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे . विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे . दुपारी साडेतीन वाजता सुटणारी चौकेवाडी एसटी अनुस्कुरापर्यंत सोडावी अशी मागणी होत आहे .
……………………
दशरथ आयरे, शिक्षक अनुस्कुरा,
८० विद्यार्थ्यांना दररोज १० किलोमीटर चालावे लागते,वयोवृद्ध नागरिकांचे हाल होत आहे,चालून चालून मुले आजारी पडत आहेत,सरिता चौगले वाकीचा धनगरवाडा ,या मूलगीने शाळा बंद केली आहे.एस टी ऑफ रंकाळा येथे अनेक फोन केले,दे दाद घेत नाहीत.