रविवारी लंम्पी दोन जनावरांचा मृत्यू
जिल्ह्यात एकूण 9 जनावरे लंम्पी रोगाने मृत
कोल्हापूर :
18 सप्टेंबर रोजी हातकणंगले तालुक्यात 5 गाई व 2 बैल असे एकूण 7 जनावरे नवीन आजारी पडले, तसेच हातकणंगले तालुक्यात दोन मृत्यू पडले,यामध्ये मुडशिंगी मधील एक गाय आणि पारगाव मधील एक बैल यांचा समावेश आहे.
पन्हाळा तालुक्यात आज नवीन एपिक सेंटर आढळले त्यात कोडोली 26 गाई, बहिरेवाडी 2 गाई असे एकूण 28 जनावरे आजारी आहेत.
पन्हाळा तालुक्यात एकही मृत्यू नाही. हातकणंगले तालुक्यात आज अखेर 23 जनावरे आजारातून बरी झालेली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी नवीन 33 गाय दोन बैल असे एकूण 35 जनावरे आजारी आढळले.
जिल्ह्यातील लॅम्पी रोगाने आजारी जनावरांची संख्या 79 गाई व 16 बैल असे एकूण 95 बाधितांची संख्या आहे.
लंपी आजारावर आज अखेर उपचार घेत असलेल्या ऍक्टिव्ह जनावरांची संख्या 63 आहे.
लंम्पी आजारामुळे दिनांक 18 /09/2022 रोजी दोन गाय वर्ग जनावरांचा मृत्यू झाला असे एकूण आज अखेर 9 जनावरे लंम्पी रोगाने मृत झालेली आहे.
जिल्ह्यात लंम्पी आजारावर एकूण झालेले लसीकरण आज अखेर 77573 ,एकूण पाच बाधित क्षेत्रातील गोवर्गीय जनावरांचे लसीकरण शंभर टक्के पूर्ण झाले आहे.अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त कोल्हापूर यांनी दिली आहे.