कोल्हापूर जिल्ह्यातील या विज्ञान उपकरणाचे दिल्लीत ‘यश’
कोल्हापूर :
डी.सी.नरके विद्यानिकेतनच्या विज्ञान उपकरणाने दिल्लीत ‘यश’ संपादन केले आहे.
येथील विद्यार्थी यश जालिंदर चौगुले याने ९ व्या इन्स्पायर अँवाॅर्ड मानक स्पर्धेअंतर्गत बनवलेल्या व पर्यवेक्षक तसेच विज्ञान विषयाचे अध्यापक एन्.एन्.काळोलीकर यांचे मार्गदर्शन घेऊन ‘डेट सीड एक्स्ट्राक्टर’ म्हणजेच ‘खारीक बी अलगीकरण’ या उपकरणाने हे यश मिळविले आहे. अंतिम प्रदर्शन दि.१४ व १५ सप्टेंबर मध्ये दिल्ली येथे पार पडले.
या प्रदर्शनामध्ये देशातून जवळपास ५५६ विद्यार्थ्यांनी आप-आपले उपकरण मांडले होते.यातून टाॅप ६० उपकरणांची पारितोषिकासाठी निवड केली जाते. या प्रदर्शनाचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम शुक्रवार दि.१६ सप्टेंबर रोजी पार पडला. यामध्ये विद्यानिकेतनच्या उपकरणाला टाॅप ६० उपकरणात समाविष्ट करण्यात आले.विद्यानिकेतनच्या बालवैज्ञानिकाने हे घवघवीत यश संपादन केले.
पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री (स्वतंत्र कार्यभार) जितेंद्र सिंह यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पार पडला.
यश चौगुलेने बनविलेल्या या उपकरणासाठी कुंभी-कासारी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच सर्व संचालक , गोकुळचे संचालक व कुंभी-कासारी बँकेचे अध्यक्ष अजित नरके , माजी आमदार व कुंभी-कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांचे प्रोत्साहन मिळाले,विद्यानिकेतचे प्राचार्य ए.एम्.पाटील , पर्यवेक्षक एन्.एन्.काळोलीकर
, सर्व विज्ञान शिक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे मार्गदर्शन मिळाले .