फोटो प्रातिनिधिक
करवीर :
कुडित्रे बस बंद केल्यास शहरात जाणारा दूध भाजीपाला बंद करू, असा इशारा यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिला आहे.
केएमटी तोट्यात असल्याच्या मार्गावरील बस सेवा बंद करा अशी मागणी हद्दवाढ कृती समितीने केल्यामुळे कुडित्रे, म्हारुळ, बहिरेश्वर बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांची व शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे.
कुंभी कारखाना परिसरात दळणवळणासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात येजा असते. कुंभी कारखान्याचे कर्मचारी, विद्यार्थी केएमटी बसणे प्रवास करतात. त्यामुळे केएमटी बसलाही उत्पन्न मिळते. शेतकरी कोल्हापूर शहरात भाजीपाला केएमटी बसनेच पुरवतात
तसेच गेले ५० वर्षापासून कुडित्रे केएमटी सुरू आहे, असे असताना बस बंद करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. बस बंद केल्यास आम्ही ग्रामीण भागातून येणारा दूध भाजीपाला बंद करू. याबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ अशी भूमिका यशवंत अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी मांडली. याबाबत परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन निर्णय घेऊ. तेव्हा केएमटी बस बंद करू नये ,बस पूर्ववत सुरू करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.