कोल्हापूर:ता०८:

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दूध खरेदी दरामध्‍ये दिंनाक ११/०९/२०२२ इ.रोजी पासुन संघाने सध्याचे गाय दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. त्‍यास अनुसरून गाय दुधासाठी सरासरी प्रतिलिटर १ रूपये वाढ केलेली आहे. दि. ०८/०९/२०२२ इ.रोजीच्‍या संचालक मंडळाच्‍या मिटिंगमध्‍ये निर्णय घेण्‍यात आला आहे.अशी माहिती संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी दिली.

      तरी दि.११/०९/२०२२  इ.रोजी पासून गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रूपये ३२.००असा दर राहिल अशी माहिती श्री.पाटील यांनी दिली व पुढे बोलताना म्हणाले गोकुळ दूध संघाकडून १ मार्च २०२२ पासून आज तागायत गाय दूध खरेदी दरात सरासरी प्रतिलिटर ५ रुपये अशी  भरघोस वाढ करून गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. भविष्यात हि गोकुळशी  संलग्न दूध उत्पादकांचे हित जोपासण्यासाठी कटिबद्ध आहोत.असे मनोगत व्‍यक्‍त केले.

तसेच सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवणेत येणार आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!