कोल्हापूर /प्रतिनिधी :
बालिंगा (ता.करवीर ) येथील क्रांती बॉईज मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवण्यात येतात. यावर्षी मंडळाकडून गाव स्तरावर काम करणार्या ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते श्रीं ची. आरती करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या हस्ते आरती करून क्रांती बॉईज मंडळाने इतर मंडळा समोर आदर्श ठेवला आहे. आरतीसाठी रघुनाथ कांबळे, संतोष कांबळे, संदीप कोरवी,संदीप कांबळे, अक्षय कांबळे, विजय जत्राटे,सुरेश पोवार, अशोक राजेशिर्के आदीसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.