कोल्हापूर:
कोल्हापूर काँग्रेस भवनमध्ये कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
प्रारंभी झाडाचे वृक्षारोपण करून आढावा बैठकीस सुरवात करण्यात आली. यावेळी पर्यावरण प्रेमी ‘ वृक्षप्रेमी ‘ संस्थेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार समीर वर्तक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वर्तक यांनी विविध प्रकल्पाद्वारे होणारी
पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कशा प्रकारे आंदोलने उभी केली यांची माहिती दिली. त्याचसोबत अनेक विषयांवर चर्चा केली.
या बैठकीतचे आयोजन कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले . यावेळी काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस अमर नानेकर, वृक्षप्रेमी संस्थेचे कार्यकर्ते,अमोल बुडे, राहुल गांधी विचार मंचचे अध्यक्ष राहुल मिणेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.